लक्ष्मणपुरी (लखनौ) : दुबईमध्ये शेख मंदिर बनवण्यासाठी भूमी आणि पैसे देत आहे, तर भारतात अयोध्येत राममंदिर बनवण्यासाठी आम्हाला न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहावी लागत आहे, अशी खंत भाजपचे उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील खासदार साक्षी महाराज यांनी व्यक्त केली आहे. ते मथुरा येथे एका कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांशी बोलत होते.
साक्षी महाराज म्हणाले,
१. हज यात्रेवर कर लावल्यावर चिंता व्यक्त केली जाते; मात्र हिंदूंच्या यात्रांवर कर लावल्यावर कुणालाही चिंता वाटत नाही.
२. एखाद्या हिंदु संतांनी म्हटले की, हिंदूंना ४ मुले असावीत, तर लगेच ओरड केली जाते; मात्र ४ पत्नी आणि ४० मुले असणार्यांच्या विषयी कुणीच काही बोलत नाही.
३. शनिशिंगणापूरवरून वाद निर्माण केला जातो; मात्र मजार इत्यादींविषयी कुणीच बोलत नाही.
४. गेल्या ६५ वर्षांत कुणी अच्छे दिन यावेत म्हणून सरकारच्या विरोधात बोलत नव्हते; मात्र अवघ्या २ वर्षांत लोकांचा संयम कसा सुटतो ?
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात