Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने सातारा येथे गणेशोत्‍सव मंडळांची बैठक पार पडली

सातारा – हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने श्री पंचपाळी हौद, दुर्गा माता मंदिर येथे गणेशोत्‍सव मंडळांच्‍या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्‍ये सातारा शहर आणि पंचक्रोशीतील गणेशोत्‍सव मंडळांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते सहभागी झाली होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे, सौ. रूपा महाडिक आणि सौ. भक्‍ती डाफळे उपस्‍थित होत्‍या. त्‍यांनी उपस्‍थितांना संबोधित केले.

राष्‍ट्र आणि धर्म रक्षणाचे उत्तरदायित्‍व गणेशोत्‍सव मंडळांचे ! – हेमंत सोनवणे

उपस्‍थितांना संबोधित करतांना श्री. हेमंत सोनवणे म्‍हणाले की, सध्‍या लव्‍ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर, हिंदूंच्‍या धार्मिक भावना पायदळी तुडवणे यांसारख्‍या अनेक गोष्‍टी घडत आहेत. राष्‍ट्र आणि धर्म रक्षणाचे उत्तरदायित्‍व धर्मप्रेमी गणेशोत्‍सव मंडळांचे आहे. हिंदु जनजागृती समिती गेल्‍या २० वर्षांहून अधिक काळ आदर्श गणेशोत्‍सव कसा साजरा करावा ? याविषयी प्रबोधन करत आहे. या कार्यात सहभागी होण्‍यासाठी आपल्‍या भागातील, गावातील, गल्लीतील गणेशोत्‍सव मंडळांमध्‍ये प्रवचने, राष्‍ट्रपुरुष आणि क्रांतिकारकांच्‍या चित्रांची प्रदर्शने, बैठका वगैरे आयोजित करू शकता. तसेच पथनाट्य आणि जिवंत देखावे यांच्‍या माध्‍यमातून लव्‍ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर आदींची दाहकता समाजापर्यंत पोचवू शकता. या वेळी सौ. रूपा महाडिक यांनी बैठकीचा उद्देश सांगितला, तर सौ. भक्‍ती डाफळे यांनी महिलांची वाढती असुरक्षितता, लव्‍ह जिहाद या माध्‍यमांतून हिंदु भगिनींवर होणारे अन्‍याय, अत्‍याचार यांविषयी उपस्‍थितांना अवगत केले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *