सच्चर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करून मुसलमानांना आरक्षण द्यावे
लव्ह जिहादची वृत्ते दाबून ठेवणे, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणे नव्हे का ?, मुसलमानांच्या या असहिष्णुतेविषयी आता मुसलमान कलाकार तोंड उघडणार का ?, हिंदूंचा वंशविच्छेद करणारा लव्ह जिहादच करू नये, असा ठराव का संमत केला नाही ?
कोल्हापूर : लव्ह-जिहादसारख्या घटनांचे भडक वृत्तांकन टाळावे, असा ठराव मुस्लीम मराठी साहित्य संमेलनात करण्यात आला आहे. (म्हणजे मुसलमानांनी हिंदूंवर अन्याय करायचा आणि वरून त्याला कोणी प्रसिद्धीही द्यायची नाही, हा तोंड दाबून बुक्क्याचा मार असणारा ठराव हिंदू सहिष्णु असल्यामुळेच संमत होऊ शकला आहे. यावरून आता हिंदुत्ववादी साहित्य संमेलनाची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे कुणाला वाटले, तर त्यात नवल ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) येथील दसरा चौकातील मुस्लीम बोर्डिंगच्या वतीने घेण्यात आलेल्या मुस्लीम मराठी साहित्य संमेलनात हा ठराव संमत करण्यात आला. २१ आणि २२ मे या दिवशी असे दोन दिवस हे संमेलन केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. २२ मे या दिवशी समारोपाच्या प्रसंगी काही ठराव करण्यात आले.
या संमेलनात केलेले अन्य ठराव
१. सच्चर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करून मुसलमानांना आरक्षण देण्याचा शासनाने निर्णय घ्यावा (सच्चर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी ही हिंदूंसाठी अन्यायकारक असल्याने हिंदुत्ववादी संघटनांचा त्याला कायम विरोध असेल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. प्रसारमाध्यमांत मुसलमान समाजाविषयी होणारे विकृत चित्रीकरण थांबवण्यात यावे.
(प्रसारमाध्यमांतून मुसलमान समाजाचे सत्य चित्रण होते; ते सत्य पेलता येत नसेल, तर त्याला कोण काय करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. मुस्लीम मराठी साहित्य संशोधन केंद्रास शासनाने १ कोटी रुपयांचा निधी द्यावा, यांसह आदी मागण्यांचे ठराव करण्यात आले.
२२ मे या दिवशी झालेल्या या संमेलनात आतंकवाद, तलाक, बहुपत्नीत्व यांसारख्या गोष्टींवर चर्चा करत बसण्यापेक्षा मुसलमान समाजातील सकारात्मक गोष्टीही माध्यमांनी समोर आणायला हव्यात, असा सूर उमटला. (स्वतःचे गुन्हे लपवण्याची ही आहे मुसलमानांची मानसिकता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात