Menu Close

श्री पुण्‍येश्‍वर मंदिराजवळील अनधिकृत मशिदीचे बांधकाम ४८ घंट्यात हटवा ! – महेश लांडगे, आमदार, भाजप

पुणे येथील अवैध मशिदीचे बांधकाम हटवण्‍यासाठी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचा पालिकेवर मोर्चा !

पुणे – आम्‍ही हिंदवी स्‍वराज्‍याचे संस्‍थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे अनुयायी आहोत. आम्‍ही पुण्‍येश्‍वराला अतिक्रमणातून मुक्‍त करण्‍यासाठी तिथे उभारलेली अनधिकृत मशीद पाडू शकतो. पुण्‍यात श्री पुण्‍येश्‍वर मंदिराजवळील अनधिकृत मशिदीचे बांधकाम ४८ घंट्यात हटवा, अन्‍यथा आम्‍ही हटवणार आहोत, अशी चेतावणी भाजप आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे. पुणे हे शहराचे नाव ज्‍यावरून पडले ते पुण्‍येश्‍वर मंदिर आणि या मंदिराच्‍या जागेवरील अवैध मशीद हटवण्‍यासाठी सकल हिंदू समाज बांधव आणि विविध संघटनांच्‍या वतीने पुणे महापालिका भवनासमोर ४ सप्‍टेंबर या दिवशी तीव्र आंदोलन करण्‍यात आले. त्‍या वेळी ते बोलत होते.

भाजप आमदार महेश लांडगे

आमदार लांडगे पुढे म्‍हणाले की, पुणे शहराला ज्‍या मंदिराच्‍या नावावरून ओळखले जाते, तो इतिहास कायम ठेवण्‍यासाठी आम्‍ही आता लढा चालू केला आहे. पुण्‍येश्‍वराला अतिक्रमणातून मुक्‍त केले पाहिजे. न्‍यायालयाने या बांधकामाला स्‍थगिती दिली आहे; पण प्रशासन कारवाई करत नाही. प्रशासनाने मुळमुळीत भूमिका घेतली आहे, या आंदोलनाची नोंद प्रशासनाने लवकरात लवकर घ्‍यावी. तसेच पुण्‍याच्‍या कोंढवा, हडपसर भागांत जर काही लोक घातक शस्‍त्र बाळगून दहशत निर्माण करण्‍याचा प्रयत्न करत असतील, तर आम्‍हीसुद्धा घरात घुसून मारल्‍याविना गप्‍प बसणार नाही. अशा चेतावणीही आमदार लांडगे यांनी या वेळी दिली. या वेळी भाजपचे आमदार नितेश राणे, पुणे भाजपचे शहराध्‍यक्ष धीरज घाटे, पुण्‍याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, हिंदुत्‍वनिष्‍ठ मिलिंद एकबोटे यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्‍थित होते.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *