Menu Close

आर्चबिशपनी हिंदूंची क्षमा मागावी – हिंदु रक्षा महाआघाडी, गोवा

पणजी (गोवा) – हिंदु धर्माची, देवदेवतांची नालस्ती करण्यासाठी चर्चचे धार्मिक व्यासपीठ वापरणारा आणखी एक पाद्री आता सर्वत्र प्रसारित झालेल्या व्हिडिओतून समोर आला आहे. पोर्तुगिजांच्या काळात चालायचा तसाच हिंदु धर्म, भारतीय राष्ट्रपुरुष, हिंदूंच्या देवता यांच्याविषयी चर्चमधील अवहेलनात्मक प्रचार थांबवावा, तसेच पाद्रयांकडून चर्चचे धार्मिक व्यासपीठ हिंदुविरोधी प्रचार करण्यासाठी वापरल्याबद्दल आर्चबिशप यांनी गोव्यातील हिंदु समाजाची सार्वजनिकरित्या क्षमा मागावी, अन्यथा हिंदु रक्षा महाआघाडीला मुक्त गोमंतकातील चर्चच्या हिंदुविरोधी आणि पोर्तुगीज चमचेगिरीच्या भूमिकेबद्दल जनजागृती करण्यासाठी मोहीम उघडून रस्त्यावर यावे लागेल, अशी चेतावणी हिंदु रक्षा महाआघाडीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे  दिली आहे.

हिंदु रक्षा महाआघाडीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर

हिंदु रक्षा महाआघाडीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हिंदु रक्षा महाआघाडी ताळगावच्या पाद्रयाचा तीव्र निषेध करत असून जातीय विद्वेष निर्माण करण्यासाठी हिंदु धर्म आणि हिंदूंच्या देवता यांविषयी अनर्गळ प्रलाप ओकण्याच्या या पाद्रयाच्या विकृतीविरुद्ध त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. –  संपादक)

गोव्याचा इतिहास पोर्तुगीजधार्जिणा बनवणारी पुस्तके निर्माण करणे, जाणीवपूर्वक राष्ट्रीय दिनांचा मुहूर्त साधून भारतीय संस्कृतीचा अवमान करून सार्वजनिकरित्या पोर्तुगीज वसाहतवाद्यांचा गौरव करणारी भाषणे करणे, भारतीय राष्ट्रपुरुषांविषयी अपमानकारक भाषणे (शेर्मांव म्हणजे प्रवचन) देण्यासाठी चर्चच्या धार्मिक व्यासपिठाचा वापर करणे, अशा प्रकारचे पाद्रयांचे उपद्व्याप दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यांच्या विरोधात आर्चबिशप ज्या अर्थी काही कारवाई करत नाहीत, त्या अर्थी हे वादग्रस्त पाद्री चर्चला अभिप्रेत असलेला अजेंडाच अधिकृतपणे राबवत तर नाहीत ना ? असा दाट संशय आम्हाला येत आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *