Menu Close

मंदिरांचे सरकारीकरण करून ती चालवणारे तामिळनाडू सरकार ‘सनातन धर्मा’ची मंदिरेही नष्ट करणार का? – गायत्री एन्., संस्थापिका, ‘भारत वॉइस’

विशेष संवाद : ‘सनातन धर्म डेंग्यू, मलेरिया यांच्यासारखा नष्ट होणार का?’

स्वत:ला ख्रिस्ती मानणारे तामिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलीन यांना सनातन धर्म नष्ट करायचा आहे; पण द्रविड विचारधारेवर चालणार्‍या तामिळनाडू सरकारला तेथील जातीयवाद मिटवता आलेला नाही. उलट तो जास्त वाढलेला आहे. तेथील हिंदु आज हतबल झाला आहे. तामिळनाडूमध्ये अतिक्रमणाच्या नावाने हिंदूंची पुरातन मंदिरे तोडली जात आहेत; मात्र चर्च किंवा मशीद यांना हातही लावला जात नाही. द्रमुक सरकारला हिंदूंमधील भेदभाव दिसतो; मात्र चर्चमधील भेदभाव का दिसत नाही ? तामिळनाडूमध्ये मंदिरांचे सरकारीकरण झालेले आहे आणि मंदिरे चालवणारे सरकारमधील मंत्री सनातन धर्म नष्ट करू पहात आहे. असे सरकार हिंदूंची मंदिरे चालवणार कि ती नष्ट करणार?, असा सवाल ‘भारत वॉइस’च्या संस्थापिका गायत्री एन्. यांनी केला आहे. हिंदु जनजागृती समितीने ‘सनातन धर्म डेंग्यू, मलेरिया यांच्यासारखा नष्ट होणार का?’ या विषयावर आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. हिंदु जनजागृती समितीचे दिल्ली प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

सत्तेच्या लालसेने सनातन धर्मावर टीका !

या वेळी ‘पी गुरुज् होस्ट’, मेगा टीव्हीचे माजी वृत्तनिवेदक जे.के. म्हणाले की, द्रमुक पक्षाची द्रविड संस्कृतीची विचारधारा सनातनविरोधी आहे. यामुळे त्यांनी प्रथम ब्राह्मणांना विरोध केला, नंतर हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती तोडल्या, देवतांचा अवमान केला. हे सर्व केल्याने सत्ता मिळाली, असे द्रमुकच्या नेत्यांना वाटते. ‘सनातन धर्म नष्ट झाला पाहिजे’, असे विधान करणे, हेही या विरोधाचाच एक भाग आहे. हिंदूंनी आज संघटित होऊन याला विरोध केला पाहिजे. द्रमुकचे समर्थक भारताचा स्वातंत्र्यदिन ‘काळा दिवस’ म्हणून मानतात. त्यांना तामिळनाडूवर ब्रिटीशांनी राज्य केलेले हवे आहे. विरोधी पक्षांनी राष्ट्रीय स्तरावर ‘I.N.D.I.A.’ नावाची आघाडी बनवली आहे. या आघाडीच्या नेत्यांवर दबाव आणून जास्त जागा आपल्या पदरी पाडून घेणे आणि आघाडीच्या पंतप्रधानपदासाठी दावा करणे, यांसाठीही अशी विधाने केली जात आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत संघटक श्री. शंभू गवारे म्हणाले की, सनातन धर्माविषयी द्वेषमूलक विधाने केल्यानंतरही तामिळनाडूमध्ये उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात एकही गुन्हा नोंदवला जात नाही. याउलट उदयनिधी यांच्या आक्षेपार्ह विधानाला विरोध करणार्‍या, तसेच आंदोलन करणार्‍या हिंदूंवर आणि हिंदू संघटना यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली जात आहे. हा प्रकार अत्यंत वेदनादायी आहे. या आंदोलनाची दखल घेऊन उदयनिधी स्टॅलीन आणि अन्य दोषींवर कारवाई केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *