Menu Close

मंदिरांचा पैसा लुटून जिहाद्यांना पुरवण्याचा डाव उघड !

केरळमध्ये ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्याला अटक

आजपर्यंत जिहाद्यांना रोखू न शकणारे केरळ शासन राज्य करण्याच्या पात्रतेचे आहे का ? जिहाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! – संपादक 

तिरुवनंतपूरम् (केरळ) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) केरळमध्ये ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेचा एक तळ उद्ध्वस्त करून नबील अहमद नावाच्या एका आतंकवाद्याला अटक  केली आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून तो केरळमध्ये ‘इस्लामिक स्टेट’साठी आतंकवाद्यांची भरती करत होता. त्यासाठी त्याने ‘पेट लव्हर्स’ नावाचा एक गट सिद्ध केला होता. आतंकवाद्यांना निधी पुरवण्यासाठी त्याने त्रिशूर आणि पलक्कड या जिल्ह्यांतील मंदिरे लुटण्याची योजना आखली होती.

नबील अहमद कतारमधील ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्यांच्या संपर्कात होता. त्याच आतंकवाद्यांच्या साहाय्याने केरळमध्ये आतंकवादी जाळे उभारण्यासाठी त्याने सर्व शक्ती पणाला लावली होती. या प्रकरणी आणखी अटक करण्यात येणार आहे, असे ‘एन्.आय.ए.’ने सांगितले. ‘एन्.आय.ए.’ने यापूर्वी ‘इस्लामिक स्टेट’मध्ये सहभागी होण्यासाठी पैसे लुटल्याच्या प्रकरणी त्रिशूरचा रहिवासी असलेल्या अशरफ याला अटक केली होती. त्याचा गट केरळमध्ये सोन्याच्या तस्करीत सहभागी असल्याचे आढळून आले होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *