-
कपाळावरील टिळे पुसले
-
पालकांकडून पोलिसांत तक्रार
-
पालक आणि हिंदु संघटना यांच्या विरोधातनंतर शिक्षकांकडून क्षमायाचना !
- देशभरातील कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांवर ख्रिस्ती धर्मांचे संस्कार केले जातात, हे अनेक वर्षांपांसून उघड होत असतांना सरकारने आता अशा शाळांवर कठोर कारवाई करण्यासह कठोर कायदेही बनवणे आवश्यक आहेत !
- हिंदु विद्यार्थ्यांना अशा शाळेत शिकण्यासाठी पाठवणार्या पालकांनीही याचा विचार करणे आवश्यक आहे. हिंदु संस्था आणि संघटना यांनी हिंदूंना योग्य शिक्षण मिळण्यासाठी अन् हिंदु धर्माचे पालन होण्यासाठी शाळा चालू करणे आवश्यक आहे ! -संपादक
हापुड (उत्तरप्रदेश) – येथील ततारपूर गावातील सेंट अँथनी माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकांनी हिंदु विद्यार्थ्यांच्या कपाळावरील टिळे पुसल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी शाळेकडे केली. या शिक्षकांनी देवतांचा अवमान करत विद्यार्थ्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी आमीष दाखवले. या संदर्भात घरी सांगितल्यास शाळेतून काढून टाकण्यात येईल, अशी धमकी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शाळेबाहेर गर्दी केली. पालक आणि हिंदु संघटना यांच्या विरोधानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने आरोपी शिक्षकांना त्यांच्या समोर बोलावले आणि पुन्हा अशी कृती न करण्याचे वचन घेत शिक्षकांना क्षमा मागण्यास सांगितले. हिंदु संघटनांचा आरोप आहे की, शाळेचे व्यवस्थापन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे.
UP: Catholic school in Hapur forces students to throw away rakhis, rub off tilak from forehead, complaint filedhttps://t.co/5vQNWfpJMZ
— OpIndia.com (@OpIndia_com) September 14, 2023
१. विश्व हिंदु परिषदेचे नेते गिरीश त्यागी यांनी आरोप केला की, शाळेमध्ये ख्रिस्ती मिशनरींशी संबंधित लोक विद्यार्थ्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांचा मानसिक छळ केला जात आहे. शाळेच्या प्रशासनाने संबंधितांवर कारवाई केली पाहिजे.
२. पालकांनी या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ऑनलाईन तक्रार केली आहे, तसेच ‘चाईल्ड वेलफेयर असोसिएशन’ आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्याकडेही तक्रार केली आहे. हापुडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मुकेश चंद यांनी सांगितले की, आम्ही चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करू.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात