संपूर्ण कुटुंबाने धर्मांतर केल्यास १ घर देण्याचे आमीष !
धर्मांतरच्या विरोधात कठोर कायदा नसल्यामुळेच ख्रिस्ती मिशनर्यांचे फावत होते, ते अद्यापही चालूच आहे. यासाठी भाजप सरकारने कठोर कायदा करणे आवश्यक आहे, अशीच हिंदूंची मागणी आहे ! -संपादक
कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील एका चर्चमध्ये अल्पवयीन हिंदु मुलाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपानंतर बजरंग दलाने चर्च बाहेर आंदोलन केले. त्या वेळी पोलिसांनी येथे येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. चर्च आणि बजरंग दल यांनी एकमेकांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. ही घटना १० सप्टेंबरला घडली.
‘अकेले ईसाई बनने पर मिलेंगे ₹50000, पूरा परिवार कन्वर्ट होगा तो FREE में घर’: बच्चे को धर्मांतरण का लालच, चर्च के बाहर ‘बजरंग दल’ का प्रदर्शन#Church #ReligiousConversion https://t.co/XNfqvoS1a4
— ऑपइंडिया (@OpIndia_in) September 13, 2023
पीडित अल्पवयीन मुलाने सांगितले की, काही दिवसांपूर्वी चर्चचा पाद्री आनंद डेनियल याने त्याला धर्मांतर करण्यासाठी ५० सहस्र रुपयांचे आमीष दाखवले होते. तसेच ‘संपूर्ण कुटुंबाने धर्मांतर केल्यास एक घर देईन’, असेही सांगितले होते. मुलाने धर्मांतरासाठी नकार दिल्यानंतरही डेनियल त्याच्यावर दबाव आणत होता.
*चर्च में नाबालिग से कहा…ईसाई बन जाओ सब कुछ मिलेगा:* लड़का बोला-मुझे घर और नौकरी का लालच दिया; पादरी समेत 3 हिरासत में https://t.co/ecmDidSfCS
Hello @Uppolice@KanpurPolice @myogioffice @hindupost @epanchjanya @eOrganiser @erbmjha @ABVPVoice @ZeeNews please act on this 😤😡
— MUKESH KUMAR YADAV (@mkynational) September 10, 2023
स्रोत: दैनिक सनातन प्रभात