- शासन गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही केव्हा करणार आहे ?
- गोरक्षकांच्या जे लक्षात येते ते पोलिसांच्या का लक्षात येत नाही ?
नगर : येथील पारनेर तालुक्यातील सुपा येथे पुणे-नगर महामार्गावर गोवंशियांची अवैध वाहतूक करणारे मालवाहू वाहन गोरक्षकांनी पोलिसांच्या साहाय्याने पकडले. या वेळी ८ गोवंश पोलिसांनी शासनाधीन केले असून ३ धर्मांधाना अटक केली आहे. त्यांची नावे इरफान सादिक सौदागर, मुकरम सौदागर आणि शहारुक सौदागर अशी आहेत.
शहजापूर येथील गोशाळेचे चालक सर्वश्री नितीन शिंदे आणि सचिन शिंदे हे महामार्गावरून जात असतांना त्यांना हंगा गावाजवळ गोवंश वाहून नेणारे वाहन दिसले. त्या वेळी त्यांनी ते अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वाहन न थांबल्याने गोरक्षकांनी या संबंधीची माहिती पोलिसांना दिली. या वेळी पोलिसांनी हे वाहन एम्आयडीसी चौकात थांबवून चौकशी केली असता वाहनचालकाकडे वाहतुकीची अनुज्ञप्ती आणि पशूसंवर्धन अधिकारी आरोग्य प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले. या वेळी वाहनात ८ बैल दाटीवाटीने भरण्यात आले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात