Menu Close

आंबेडकरनगर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांनी छेड काढल्यामुळे झालेल्या अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू

पळून जाणार्‍या आरोपींना पकडतांना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण घायाळ

अल्पसंख्यांक असलेले सर्व प्रकारच्या गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात ! याविषयी देशातील एकही राजकीय पक्ष, नेते, निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! -संपादक 

आंबेडकरनगर (उत्तरप्रदेश) – येथील हिरापूर बाजारात २ विद्यार्थिनी सायकलवरून घरी परतत असतांना दुचाकीवर आलेल्या दोघा धर्मांध मुसलमानांनी एका विद्यार्थिनीची छेड काढतांना तिची ओढणी खेचली. यामुळे ती खाली पडली आणि मागून येणार्‍या दुचाकी वाहनाने तिला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्हीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

पोलिसांनी दुचाकी वाहनावरील छेड काढणार्‍या दोघा धर्मांध मुसलमान तरुणांसह धडक देणार्‍या दुचाकीस्वारालाही अटक केली आहे. शहबाज, अरबाज आणि फैसल अशी त्यांची नावे आहेत. छेड काढणारे दोघे मुसलमान भाऊ आहेत. पोलीस जेव्हा या मुसलमान तरुणांना अटक करण्यास गेले, तेव्हा ते पळू लागल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात एकाच्या पायाला गोळी लागली, तर दुसरा खाली पडला.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *