Menu Close

सनातन धर्माला नष्‍ट करण्‍याची भाषा करणार्‍या नेत्‍यांवर कठोर कारवाई करा !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या बैठकीत करण्‍यात आली मागणी !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – सनातन धर्माला नष्‍ट करण्‍याची भाषा करणारे तमिळनाडूचे खेळमंत्री उदयनिधी स्‍टॅॅलिन, कर्नाटकचे ग्रामीण विकास मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे ‘द्रमुक’ खासदार ए. राजा यांना तात्‍काळ अटक करण्‍यात यावी, या मागणीसाठी येथील हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीला ‘भगवा रक्षा वाहिनी’चे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष श्री. आशिष तिवारी, ‘ब्राह्मण परिवार’चे राष्‍ट्रीय महासचिव श्री. रामकेवल मिश्रा, ‘सीताराम परिवार’चे अध्‍यक्ष श्री. सनी साहू, ‘इस्‍कॉन’चे लक्ष्मणपुरी जिल्‍हाध्‍यक्ष श्री. अप्रमेयजी, ‘हिंदू संरक्षण मंच’चे अधिवक्‍ता राघवेंद्र मिश्रा, ‘आव्‍हान धर्मरक्षार्थ सेवा समिती’चे अध्‍यक्ष श्री. शिवांश त्रिवेदी, ‘हिंदु जनजागृती समिती’चे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्‍य समन्‍वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी, तसेच श्री. प्रशांत वैती उपस्‍थित होते.

‘भारताची सुरक्षा आणि अखंडता यांच्‍या दृष्‍टीने केंद्र सरकारने खासगी इस्‍लामी संस्‍थांना हलाल प्रमाणपत्र प्रदान करण्‍याची अनुमती देऊ नये, या मागणीसाठी सर्व संघटना केंद्र सरकारकडे मागणी करतील’, असेही या बैठकीमध्‍ये ठरले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *