Menu Close

तेलुगू चित्रपट ‘रझाकार’चे टीझर प्रदर्शित, रझाकारांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांचे जिवंत चित्रण !

विज्ञापनाच्या प्रदर्शनाच्या वेळी प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह उपस्थित !

मुंबई – तेलुगू चित्रपट ‘रझाकार’चे छोटे विज्ञापन (टीझर) प्रदर्शित करण्यात आले आहे. हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्यानंतरही वेगळे असणार्‍या हैद्राबाद येथील निजामाच्या राज्यातील सत्य घटनांवर आधारित आहे. यात निजामाच्या शासन काळात ‘रझाकार’ नावाचे सैन्य कासिम रिझवी याने उभारले होते. या सैन्याकडून हिंदूंवर प्रचंड अत्याचार करण्यात आले. याची माहिती या चित्रपटात देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हैद्राबादचे संस्थान पोलिसी कारवाई करून भारतात विलीन करण्यात आल्यानंतर रझाकार सैन्य ‘मजलिस-ए-इत्तहादुल मुसलमीन’ अर्थात् एम्.आय.एम्. या पक्षात रूपांतरित झाले. ‘रझाकार’ चित्रपट ‘समरवीर क्रिएशन्स’ या आस्थापनाकडून बनवण्यात आला आहे. या टीझरच्या प्रदर्शनाच्या वेळी भाग्यनगर येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह उपस्थित होते.

चित्रपटात रझाकारांनी हिंदूंवर केलेले अत्याचारांचे चित्रण

१. कासिम रिझवी नेहमीच सैन्याधिकार्‍याच्या वेशात रहात होता. रिझवी याने प्रत्येक घरावर इस्लामी झेंडा लावण्याचा आदेश दिला होता.

२. रिझवी याला ब्राह्मणाच्या अंगावरचे यज्ञोपवित कापतांना दाखवले आहे.

३. निझाम म्हणतो, ‘भारत पहिल्यापासूनच अनेक समस्यांनी ग्रस्त असतांना अशा स्थितीत हैद्राबाद इस्लामी राज्यच राहील. चोहोबाजूंनी मशिदी बनवल्या पाहिजेत. यज्ञोपवित कापून त्यांना जाळले पाहिजे.’

४. या टीझरमध्ये रझाकार सैन्य घोड्यावर बसून हिंदूंचा शिरच्छेद करत आहेत. तलवारीने हिंदूंना ठार करत आहेत. गोळीबार करत आहेत. हिंदु पुरुषांना पकडून त्यांच्या मिशा कापण्यात येत आहेत. त्यांना इस्लामी टोपी घालण्यास लावले जात आहे. ब्राह्मणांच्या शिखा (शेंडी) कापल्या जात आहेत. शाळांतील पुस्तकांमधून संस्कृत, तेलुगू, कन्नड आणि मराठी भाषा हटवून अरबी शिकवण्याचा आदेश देत आहे.

५. रझाकार म्हणतात, ‘जे काफीर इस्लाम स्वीकारण्यास नकार देतील त्यांना ठार करा.’

६. एका प्रसंगामध्ये रझाकार एका पुजार्‍याच्या पूजेच्या तांब्यामध्ये थूंकताना दाखवले आहे.

७. हिंदूंना बांधून फरफटत नेले जात आहे.

८. शेकडो हिंदूंना ठार करून त्यांचे मृतदेह झाडाला टांगण्यात आले आहेत.

९. हिंदु महिलांसमोर त्यांच्या पती, मुले यांना तलावात फेकले जात आहे.

१०. हिंदूंच्या हत्या करतांना ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) अशा घोषणा दिल्या जात आहेत.

११. हिंदूंच्या महिला, मुली यांच्यावर बलात्कार करण्यात आले. हिंदूंना जाळले जात आहे. त्यांची घरे जाळली जात आहेत.

‘मजलिस बचाओ तहरीक’ संघटनेकडून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

‘रझाकार’ चित्रपटाचे छाटे विज्ञापन प्रदर्शित करण्यात आल्यावर तेलंगाणामधील ‘मजलिस बचाओ तहरीक’ (एम्.बी.टी.) या संघटनेचे प्रवक्ते अमजद उल्लाह खान यांनी म्हटले की, या चित्रपटात विकृत इतिहास दाखवण्यात आला आहे. संपूर्ण चित्रपट कल्पनेच्या आधारे बनवण्यात आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांमध्ये द्वेष पसरवण्यात येणार आहे. या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे.

हा चित्रपट कधी प्रदर्शित करण्यात  येणार आहे, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही; मात्र हा चित्रपट तेलुगुसह, तमिळ, मल्याळम्, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्येही प्रदर्शित करण्यात येणार आहे, असे सांगितले जात आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *