Menu Close

कन्याकुमारी येथील ख्रिस्ती पोलिसांकडून मंदिराचे पावित्र्य भंग !

धर्मांध ख्रिस्ती पोलीस ! सहिष्णुतावाद्यांना ख्रिस्त्यांची असहिष्णुता दिसत नाही का ?

christi_police

कन्याकुमारी (तमिळनाडू) : ख्रिस्तीबहुल कन्याकुमारी जिल्ह्यामध्ये कोट्टालुमोडू भगवती अम्मन मंदिर आहे. प्रत्येक उन्हाळ्यात या मंदिरात उत्सव साजरा केला जातो. या वेळी मध्यरात्रीपर्यंत आतषबाजी केली जाते. यावर्षी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी आतषबाजी करण्यास अनुमती नाकारली; मात्र विनंती केल्यानंतर त्यांनी रात्र १० वाजण्याच्या आधी अर्धातास आषबाजी करण्यास अनुमती दिली. हिंदु भाविकांनी ही अट मान्य करून आतषबाजी केली. (धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच हिंदू मंदिरात आतषबाजी करतात ! राष्ट्र आणि धर्म हानी टाळण्यासाठी अशी कृत्ये रोखणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी काही हिंदु मुलेही आतषबाजी करत होते. त्यांना या अटीविषयी माहिती नव्हती.

नियमांचा भंग केल्याने पोलीस बूट घालून मंदिरात शिरले आणि त्यांनी तेथे उपस्थित मुले आणि महिला यांना अमानुष मारहाण केली. (ख्रिस्ती पोलीस मशिदीत अशा प्रकारे शिरले असते का ? हिंदूंचे परिणामकारक संघटन नसल्यामुळेच धर्मांध पोलीस असे कुकृत्य करण्यास धजावतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी पोलिसांनी देवळातील मूर्तींवर लाठ्या मारल्या, तसेच पूजेच्या साहित्याची नासधूस केली. (प्रसारमाध्यमांना हे दिसत नाही का ? हिंदूंवर होणार्‍या आघातांकडे दुर्लक्ष करणार्‍या प्रसारमाध्यमांवर बहिष्कार घाला ! अशा पोलिसांवर कठोर कारवाई होण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *