Menu Close

कपडे धुण्‍याचा व्‍यवसाय करणार्‍या अल्पसंख्यांकांना २५० युनिट वीज निःशुल्‍क देण्‍याचा तेलंगाणा सरकारचा आदेश !

मुसलमानांच्‍या एकगठ्ठा मतांसाठी भारत राष्‍ट्र समिती सरकार कोणत्‍या थराला जाऊ शकते, हे यातून दिसून येते ! -संपादक 

भाग्‍यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नुकताच कपडे धुण्‍याचा व्‍यवसाय करणार्‍या मुसलमानांना २५० युनिट निःशुल्‍क वीज देण्‍याचा आदेश दिला. यापूर्वी हा लाभ कपडे धुण्‍याचा व्‍यवसाय करणार्‍या मागासवर्गियांना दिला जात होता.  भाग्‍यनगरचे संसद सदस्‍य आणि एम्.आय.एम्. पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी ही मागणी केली होती. तेलगंणामध्‍ये पुढील काही मासांत विधानसभाची निवडणूक होणार आहे. त्‍या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेतल्‍याचे बोलले जात आहे.

तेलंगाणामध्‍ये हिंदूंना केले जाते लक्ष्य ! – भाजप

तेलंगाणामध्‍ये हिंदूंना लक्ष्य केले जात असल्‍याचा आरोप भाजपच्‍या प्रदेशाध्‍यक्षांनी केला आहे. भाजपचे राष्‍ट्रीय सरचिटणीस आणि खासदार बंडी संजय कुमार यांनीही सरकारच्‍या या आदेशाचा निषेध केला. ‘तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव हिंदु ‘रजक’ समाजाचा व्‍यवसाय उद़्‍ध्‍वस्‍त करत आहेत’, असा आरोप कुमार यांनी केला.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *