‘टीप्स भक्ती प्रेझेंट्स’च्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी कथित प्रबोधनाचा प्रयत्न !
- पोलिसांनी त्यांची कामे योग्य प्रकारे केली, तर अशा प्रकारे प्रबोधन करण्याची आवश्यकता भासणार नाही !
- प्रबोधनासाठी देवतांचे मानवीकरण करण्यातून देवतांची विटंबना होते, हे हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच लक्षात येत नाही !
- अन्य धर्मीय कलाकार त्यांच्या श्रद्धास्थानांची विटंबना करतांना कधी दिसतात का ? हिंदु कलाकार मात्र पैशांसाठी असे करतात ! -संपादक
मुंबई – गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘टीप्स भक्ती प्रेझेंट्स’ने ‘गणेशचतुर्थी २०२३ स्पेशल साँग पोलीस बप्पा’ म्हणून ‘ नशे से मुक्ती’ हे गीत प्रसारित केले आहे. यामध्ये श्री गणेशवंदन करत कलावंतांनी श्री गणेशापुढे नृत्य केले आहे. या गीतामध्ये श्री गणेशाला शास्त्रानुरूप दाखवण्याऐवजी पोलिसांच्या गणवेशात दाखवण्यात आले आहे.
अनिल कपूर, पद्मनी कोल्हापूरे, अनु मलिक, उषा नाडकर्णी, राखी टंडन आदी कलाकारांनी या गीतामध्ये नृत्य केले आहे.
In recent years, there has been a tradition of bringing Ganpati Bappa to the Police Line and adorning him as a police officer. His role varies from being an IPS officer in one Ganeshotsav to a traffic police officer in another. This year, the theme for #PoliceBappa is centered… pic.twitter.com/ByADPZpGW8
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) September 23, 2023
(‘श्री गणेशाचे रूप कसे असावे ?’ हे शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे आराधनेसाठी शास्त्रात सांगितल्यानुसार देवतेची मूर्ती असणे, हे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायी आहे. उलट नाविन्याच्या नावाखाली देवतेचे रूप अशास्त्रीय पद्धतीने साकारणे, हा त्या देवतेच्या तत्त्वाचा अवमान आहे ! – संपादक)
स्रोत: दैनिक सनातन प्रभात