Menu Close

श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नदीपात्रात न करता मूर्तीदान करण्याचे आळंदी नगर परिषदेचे धर्मद्रोही आवाहन !

धर्मशास्त्रानुसार मूर्तीदान अयोग्य आणि अशास्त्रीय आहे. गणेशभक्तांनीच दान घेतलेल्या श्री गणेशमूर्तींचे काय होते ? याचे वास्तव जाणून धर्मभावना दुखावणार्‍या आळंदी नगर परिषदेला जाब विचारला पाहिजे. -संपादक 

धर्मशास्त्रानुसार मूर्तीदान अयोग्य आणि अशास्त्रीय आहे.

पुणे (महाराष्ट्र) – आळंदी नगर परिषदेने ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अभियानाच्या अंतर्गत जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी शहरात एकूण ६ मूर्ती संकलन केंद्रांचे नियोजन केले आले. सर्व नागरिकांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नदीपात्रात न करता नगर परिषदेच्या मूर्ती संकलन केंद्रावर मूर्तीदान करावे, असे आवाहन आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.

केंद्रे यांनी सांगितले की,

१. या मूर्तींचे नद्या, तलाव, विहिरी यांमध्ये विसर्जन केल्यानंतर त्यांचे अवशेष पाण्यात न विरघळता तसेच रहातात. परिणामी जलप्रदूषण होऊन पाण्यातील अनेक जिवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. त्यामुळे आळंदी नगर परिषद मागील काही वर्षांपासून ‘मूर्तीदान’ ही संकल्पना राबवत असून यास समस्त आळंदीकरांचा मोठा पाठिंबा मिळतो आहे.

२. नगर परिषदेच्या वतीने सिद्ध केलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर विधीवत् आरती करून श्री गणेशमूर्ती व्यवस्थितरित्या जमा केल्या जातात आणि या मूर्ती पुढे पुनर्वापरासाठी सेवाभावी संस्थांना दिल्या जातात.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *