समितीच्या कार्यकर्त्यावर गुन्हा नोंदवण्याची पोलीस अधिकार्याची धमकी !
भारतीय अर्थव्यवस्था आणि राज्यघटना यांच्याशी विसंगत, तसेच देशविरोधी असणार्या आणि बहुसंख्यांकांवर अन्याय करणार्या हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात कृती करण्याऐवजी त्याविषयी जागृती करणार्या हिंदुत्वनिष्ठांवर गुन्हा नोंदवण्याची भाषा करणारे चिपळूण पोलीस भारताचे कि पाकिस्तानचे ? -संपादक
चिपळूण (महाराष्ट्र) – ‘हलालमुक्त गणेशोत्सव’ मोहिमेच्या अंतर्गत प्रबोधन करण्यासाठी शहर आणि परिसरात ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ने लावलेले २० फलक चिपळूण पोलीस यंत्रणेने काढून टाकले आहेत. हे फलक नगर परिषदेच्या कर्मचार्यांच्या साहाय्याने काढण्यात आले. ‘धार्मिक तेढ निर्माण होऊ नये’, असे कारण देत ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. (मुळात घटनाबाह्य ‘हलाल अर्थव्यवस्थे’मुळे धार्मिक तेढ निर्माण होत नाही का ? यावर पोलीस यंत्रणा का बोलत नाही ? – संपादक)
विशिष्ट राजकीय पक्ष आणि अल्पसंख्य समाजातील राजकारणी, यांचा फलकाला विरोध !
शहराजवळच्या एका भागातून तेथील राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि अल्पसंख्यांक राजकारणी यांच्याकडून त्या भागात लावलेल्या फलकाला विरोध दर्शवण्यात आला. त्यासंदर्भात तेथील उपसरपंच यांना पोलीस चौकीतून आणि एका ग्रामपंचायत सदस्या यांच्याकडून फलक काढण्यास सांगण्यात आले. त्यानुसार उपसरपंचांनी तो फलक काढला.
फलक उतरवा, अन्यथा तुमच्याविरुद्ध गुन्हे नोंदवू ! – पोलीस अधिकार्याची अरेरावी
नगरपालिकेकडून सूचना न मिळताच ‘हलालमुक्त गणेशोत्सव’चे फलक काढले जात आहेत, हे समजल्यावर हलाल सक्तीविरोधी कृती समितीचे एक कार्यकर्ते त्यामागील कारण समजून घेण्यासाठी घटनास्थळी गेले. वाटेत चिपळूण पोलीस स्थानकाचे अधिकारी यांनी त्यांना थांबवून ‘तुम्ही गणेशोत्सवात हलालचे फलक का लावले आहेत ? ते ताबडतोब उतरवा, नाहीतर तुमच्यावर गुन्हा नोंदवण्यात येईल’, असे सांगितले. वस्तूस्थिती अशी होती की, पोलीस यंत्रणेने पालिका प्रशासनाला हे फलक तातडीने काढण्यास सांगितले आणि त्यासाठी पोलीस बंदोबस्तही पुरवला.
पोलिसांच्या आततायी कारवाईविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून संताप व्यक्त !
हलाल अर्थव्यवस्था आणि त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा दुष्परिणाम, तसेच ८० टक्के हिंदु ग्राहक यांवर लादण्यात आलेली ही अघोषित हलाल सक्ती, या विरोधात घटनात्मक मार्गाने प्रबोधन करण्याचा अधिकार असतांनाही पोलीस आणि नगर परिषद प्रशासन यांनी हिंदुत्वनिष्ठांना कोणतीच कल्पना न देता फलक काढल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात पोलीस अधिकार्यांना विचारणा करण्यात येणार असल्याचे समजते.