अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनानंतर मुख्याध्यापक आणि कर्मचारी निलंबित
अशा शाळांची मान्यता रहित केली पाहिजे आणि अन्य कॉन्व्हेंट शाळांमध्ये काय चालू आहे ?, याचाही शोध घेतला पाहिजे ! -संपादक
गुना (मध्यप्रदेश) – येथील प्रिंस ग्लोबल स्कूल या कॉन्व्हेंट शाळेमध्ये हिंदु विद्यार्थिनींकडून हिजाब घालून एका हिंदी चित्रपटातील गाण्यावर नृत्य सादर केले. याची माहिती मिळाल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शाळेत येऊन आंदोलन केले. त्यांनी घोषणाबाजी केली.
हिजाब पहनकर किया ‘बजरंगी भाईजान’ के गाने पर डांस, भड़की ABVP ने स्कूल में लगाए वंदे मातरम के नारे https://t.co/druRVx2nCk #slogans #mataram
— ASB NEWS INDIA (@asbnewsindia) September 29, 2023
याची माहिती मिळताच पोलीस शाळेत पोचले. जोपर्यंत शाळेचे मुख्याध्यापक आणि अन्य संबंधित यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्यात येईल, असे परिषदेकडून सांगण्यात आल्यानंतर मुख्याध्यापक आणि अन्य कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संयोजक विकास शिवहरे यांनी सांगितले की, शाळेमध्ये शिक्षणाच्या ठिकाणी धर्मांतराला प्रोत्साहन दिले जात आहे.
स्कूल में हिन्दू बच्चों को हिजाब पहनाकर इस्लामिक गाने पर कराया डांस।
वीडियो मध्यप्रदेश के गुना के प्रिंस ग्लोबल प्राइवेट स्कूल का। pic.twitter.com/ZL8dGxrg67
— Panchjanya (@epanchjanya) September 29, 2023
स्रोत: दैनिक सनातन प्रभात