Menu Close

नमाजपठण करायचे असेल, तर मशिदीमध्ये जा !

नमाजपठणासाठी विमानतळामध्ये स्वतंत्र खोली ठेवण्याची मागणी गौहत्ती उच्च न्यायालयाने फेटाळली !

रस्त्यांवर आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी विनाअनुमती नमाजपठण करून नागरिकांना बाधा निर्माण करण्यावरही न्यायालयाने आदेश द्यावा, असेही जनतेला वाटते ! -संपादक

गौहत्ती (आसाम) – येथील विमानतळामध्ये नमाजपठणासाठी स्वतंत्र खोली देण्याची मागणी करणारी याचिका गौहत्ती उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने याचिकाकर्त्या मुसलमानाला फटकारतांना म्हटले, ‘भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. एखाद्या समाजाच्या मागणीवरून अशी व्यवस्था केली जाऊ शकत नाही. नमाजपठणासाठी मशिदी आहेत. ज्याला नमाजपठण करायचे आहे, त्याने तेथे जावे.’

राज्यघटनेमध्ये सार्वजनिक ठिकाणी प्रार्थनेसाठी खोली ठेवण्याचा उल्लेख आहे का ?

राणा सुदैर जमान या व्यक्तीने ही याचिका प्रविष्ट केली होती. न्यायालयाने या वेळी जमान याला विचारले की, राज्यघटनेमध्ये ‘सर्व सार्वजनिक ठिकाणी प्रार्थनेसाठी खोली असावी’, अशा प्रकारच्या अधिकाराचा कुठे उल्लेख आहे ? सरकारने काही विमानतळांमध्ये प्रार्थनेसाठी खोल्या बनवल्या आहेत; मात्र याचा अर्थ असा नाही की, सर्वच सार्वजनिक ठिकाणी प्रार्थनेसाठी खोली असली पाहिजे. मग केवळ विमानतळच का ? प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी का नाही ? अशा प्रकारची मागणी करणे, हा मूलभूत अधिकार आहे का ?

नमाजपठणातून कोणतेही उत्पन्न मिळत नाही !

राणा जमान याने न्यायालयाने म्हटले की, विमानतळामध्ये धूम्रपान, स्पा आणि उपाहारगृह बनवण्याचा नियम आहे; मग नमाजपठणासाठीही एक खोली असली पाहिजे.

यावर न्यायालयाने म्हटले की, धूम्रपानासाठी वेगळी खोली यासाठी बनवली जाते कारण धूम्रपानाचा इतरांना त्रास होऊ नये. उपाहारगृहांतून उत्पन्न मिळते; पण लोक  नमाजपठणासाठी गेले, तर त्यातून कोणतेही उत्पन्न मिळणार नाही.

याचिकेत पुढे असेही म्हटले होते, ‘बहुतांश विमानांच्या वेळा नमाजाच्या वेळी असतात. त्यामुळे वेगळी खोली असायला हवी.’ यावर न्यायालयाने म्हटले की, प्रत्येक प्रवाशाला विमानाची वेळ निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्याला ज्या वेळेमध्ये सुटणारे विमान हवे आहे, ती वेळ तो निवडू शकतो.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *