पुणे पोलिसांच्या नियंत्रणातून पळाला होता !
नवी देहली – देहली पोलिसांच्या विशेष पथकाने इस्लामिक स्टेटचा आतंकवादी महंमद शाहनवाज याच्यासह अन्य २ आतंकवाद्यांना अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या नियंत्रणातून शाहनवाज पळून गेला होता. पळाल्यानंतर तो देहलीमध्ये लपून बसला होता. शाहनवाज पुणे येथील गटाचा (मॉड्यूलचा) आतंकवादी होता. त्याला पकडण्यासाठी ३ लाख रुपयांचे बक्षिसही घोषित करण्यात आले होते. तो व्यवसायाने अभियंता असून देहलीचा रहिवासी आहे. शाहनवाजसह अटक झालेल्या तिन्ही आतंकवाद्यांची सध्या चौकशी चालू आहे.
#Delhi से #ISIS आतंकी शाहनवाज समेत दो अन्य गिरफ्तार, #NIA की लिस्ट में था मोस्ट वॉन्टेडhttps://t.co/M9Ptn8ZzAF
— Times Now Navbharat (@TNNavbharat) October 2, 2023
पुणे मॉड्यूल प्रकरणात आतापर्यंत एका डॉक्टरसह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अजून रिझवान अब्दुल उपाख्य हाजी अली, अब्दुल्ला फैयाज शेख उपाख्य डायपरवाला आणि तल्हा लियाकत खान यांचा शोध घेतला जात आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने या तिघांवर प्रत्येकी ३ लाख रुपयांचे बक्षिस घोषित केले आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात