Menu Close

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे ईदच्या मिरवणुकीवर अज्ञातांनी दगडफेक केल्यावर मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांवर दगडफेक !

  • पोलिसांनी लाठीमार करून परिस्थिती आणली नियंत्रणात !

  • जमावबंदी आदेश लागू !

  • टिपू सुलतान हिंदु योद्ध्याची हत्या करत असल्याचा लावण्यात आलेला मोठा फलक पोलिसांनी झाकला !

  • ‘हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी जाणीवपूर्वक ईदच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्याचा कट धर्मांध मुसलमानांनी रचला होता का ?’, याची चौकशी झाली पाहिजे !
  • फलक झाकून टिपूप्रेमींमधील धर्मांधता नष्ट होणार का ? त्याऐवजी असे चिथावणीखोर फलक लावणार्‍या धर्मांधांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य पोलीस का करत नाहीत ? -संपादक 
जी. परमेश्‍वर

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील शिवमोग्गा येथील शांतीनगर भागात रात्री मुसलमानांनी ईद निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीच्या वेळी अज्ञातांनी केलेल्या दगफेकीनंतर येथे हिंदूंच्या घरांवर दगडफेक करण्यात आली. या वेळी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यानंतर या भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ईदची मिरवणूक येथील रागीगुड्डा भागामध्ये पोचल्यावर ही घटना घडली.

या भागात मुसलमानांनी टिपू सुलतानचा फलक लावला होता. यात टिपू सुलतान एका हिंदु योद्ध्याची हत्या करतांना दाखवण्यात आले होते. पोलिसांनी हा फलक कपड्याद्वारे झाकले. या घटनेमुळे येथे तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी अधिक कुमक मागवली. काही वेळाने एका मुसलमान तरुणाने या फलकावर स्वतःच्या रक्ताने ‘शेर टिपू’ असे लिहिले. यानंतर येथे मिरवणुकीला प्रारंभ झाला. अज्ञातांनी या मिरवणुकीवर दगडफेक केल्यानंतर मिरवणुकीत सहभागी मुसलमानांनी या भागातील हिंदूंच्या घरांवर दगडफेक केली. त्या वेळी पोलिसांनी मुसलमानांवर लाठीमार करून त्यांना पागवले. या लाठीमारात ४ जण घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

(म्हणे) ‘शिवमोग्गा येथे अशी घटना नव्याने घडत आहे का ?’

काँग्रेस सरकारचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर यांचे दायित्वशून्य विधान !

जी. परमेश्‍वर

या घटनेविषयी राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की,

१. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांची नावे ठाऊक असूनही मी तुम्हाला सांगणार नाही. (दंगल करणारे धर्मांध मुसलमान असल्याने काँग्रेसवाले त्यांचे रक्षक असल्याने परमेश्‍वर त्यांची नावे सांगणार नाहीत, हे स्पष्ट आहे ! – संपादक) त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

२. शिवमोग्गा येथे असे नव्याने घडत आहे का ? (‘नव्याने घडत नाही’ म्हणजे असे सतत घडत आलेले आहे. पोलीस आणि शासनकर्ते यांच्या निष्क्रीयतेमुळेच शिवमोग्गा येथे अशा प्रकारच्या घटना सतत घडतात, हे यातून स्पष्ट होते. तरीही शासनकर्त्यांना असे सांगायला लाज वाटत नाही ! – संपादक) घटनेला नियंत्रणात आणण्यास पोलीस समर्थ आहेत. तिथे तणाव आहे, हे ठाऊक होते. मिरवणूक आल्यावर काहीतरी घडेल, हे ठाऊक होते; म्हणून मोठ्या प्रमाणात दंगल झाली नाही. तो नियंत्रित केला आहे.

३. फलक, भित्तीपत्रक लावून दंगल करण्यास प्रोत्साहन दिले जाते. संपूर्ण राज्यात अशा घटना घडल्या आहेत. त्यावर आम्ही नियंत्रण मिळवले आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूंकडील लोकांना अटक केली आहे. आताच्या घटनेत कोणत्याही अहितकारी घटना घडू दिल्या नाहीत. दोन्ही समुदायांना चेतावणी दिली होती. त्याचे उल्लंघन केल्यास साहजिकच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणारच.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *