Menu Close

देशात १८ ठिकाणी रासायनिक बाँबस्फोट घडवण्याचा होता कट !

देहलीत अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड !

  • हिंदूंच्या मूळावर उठलेल्या जिहाद्यांना जोपर्यंत फाशीची शिक्षा देणारा कायदा होत नाही, तोपर्यंत ते वारंवार असे धाडस करत रहातील. यासाठी आता हिंदूंनीच संघटित होऊन सरकारला असा कायदा करण्यास भाग पाडले पाहिजे !
  • हिंदूंकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे कुणाचेही धाडस होऊ नये, यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे ! -संपादक 

नवी देहली – देहलीतून अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटच्या ३ आतंकवाद्यांनी मंदिरे, मजार (मुसलमानाचे थडगे) यांसह मुंबई, सुरत, वडोदरा, गांधीनगर आणि कर्णावती येथील राजकीय नेत्यांची ठिकाणे आदी एकूण १८ ठिकाणी रासायनिक बाँबस्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता, अशी माहिती उघड झाली आहे. यासाठी त्यांनी काही भागांचे निरीक्षणही केले होते.

गोव्यात होता बाँब बनवण्याचा तळ !

या आतंकवाद्यांनी घातपात करण्यासाठी नवीन तरुण शोधण्यासाठी पुणे, बेंगळुरू आदी ठिकाणांहून मुसलमान तरुणांचा बुद्धीभेद करून त्यांना जाळ्यात ओढण्याचे काम चालू केले होते. अशा तरुणांना रासायनिक बाँब कसे बनवायचे ? आणि कट यशस्वी कसा करायचा ?, यांचे प्रशिक्षण देण्यासाठी अनेक ठिकाणी तळ उभारले होते. यांपैकी एक तळ गोव्यातही होता.

देशातील काही राज्यांत होते तळ !

गोव्यासह लवासा (पुणे), महाबळेश्‍वर (सातारा), हुबळी आणि उडुपी (कर्नाटक) तसेच केरळमधील वलसाड वन्यजीव अभयारण्य, नल्लामला पर्वत रांगा आणि चांदौली येथे तळ उभारण्यासाठी या आतंकवाद्यांनी जागा शोधून तेथे तळ उभारले होते.

पुण्याजवळील जंगलात केली होती बाँबस्फोटाची चाचणी !

पुण्याजवळील लवासा येथील जंगलात या आतंकवाद्यांनी बाँबस्फोटाची पहिली चाचणीही केली होती. नंतर उत्तराखंडमधील हल्दानी, देहली आणि राजस्थान येथे अनेक ठिकाणीही चाचण्या घेतल्या होत्या. (याचा जराही थांगपत्ता न लागणे पोलिसांचा अत्यंत लज्जास्पद ! अशा पोलिसांच्या हाती जनतेचे जीवन कधी तरी सुरक्षित राहील का ? – संपादक)

शाहनवाजने हिंदु तरुणीशी विवाह करून तिचे धर्मांतर करत तिला बनवले आतंकवादी !

अटक करण्यात आलेल्या ३ आतंकवाद्यांपैकी एक असणार्‍या शाहनवाज याने गुजरातमधील एका हिंदु तरुणीशी विवाह करून तिचे धर्मांतर केले होते. शाहनवाज याने पत्नीचाही बुद्धीभेद करून तिला आतंकवादी बनवले होते. तीही या त्यांच्या कटात सहभागी होती. सध्या ती पसार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. शाहनवाज बाँब बनवण्यात सराईत होता. तो झारखंडमधील हजारीबाग येथील रहिवासी आहे. (‘द केरल स्टोरी’ चित्रपटामध्ये जी कथा दाखवण्यात आली होती, तीच शाहनवाज याने रचल्याचे लक्षात येते ! ‘द केरल स्टोरी’ चित्रपटातील कथा चुकीची आहे’, असे म्हणणारे तथाकथित निधर्मीवादी याविषयी बोलतील का ? -संपादक )

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *