Menu Close

‘पाकिस्तान अन्टोल्ड’ संघटनेने घेतले १ सहस्र २०० हिंदु शरणार्थी मुलांना दत्तक !

  • विनामूल्य शिक्षण देण्याची केली व्यवस्था !

  • अर्थसाहाय्य करण्याचे केले हिंदूंना आवाहन !

‘पाकिस्तान अन्टोल्ड’ संघटनेचे अभिनंदन ! अशा हिंदुत्वनिष्ठ संघटनाच हिंदु धर्माची शक्ती होत ! -संपादक 

छायाचित्र सौजन्य: Pakistan Untold

जोधपूर (राजस्थान) – पाकमधील धर्मांध मुसलमानांच्या जाचाला कंटाळून सहस्रावधी हिंदू इस्लाम धर्म न स्वीकारता त्यांचा जीव मुठीत धरून भारतात शरण घेत आले आहेत. जोधपूर आणि जैसलमेर येथून अशाच १ सहस्र २०० हिंदु मुलांना ‘पाकिस्तान अन्टोल्ड’ नावाच्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने दत्तक घेतले आहे. त्या सर्वांना विनामूल्य शिक्षण देण्याचा या संघटनेचा मानस आहे. याविषयीची माहिती या संघटनेने तिच्या ट्विटर खात्यावरून दिली आहे.

या कार्यासाठी ‘पाकिस्तान अन्टोल्ड’ने हिंदूंना धनरूपात दान देण्याचे आवाहन केले आहे. संघटनेने ट्वीटमध्ये म्हटले आहे, ‘हिंदूंनो, आमची शक्ती बना ! प्रत्येक मुलासाठी वार्षिक ५ सहस्र रुपयांचा खर्च असून मुलांच्या संगोपनासाठी कार्यरत असलेल्या आमच्या विविध केंद्रांसाठीही पैशाची आवश्यकता आहे. प्रत्येक केंद्राला मासिक २५ सहस्र रुपयांची आवश्यकता आहे.’

येथे करू शकता अर्थसाहाय्य !

ऑनलाईन अर्थसाहाय्य करण्यासाठी संघटनेने दिलेले तिचे ‘यूपीआय आयडी’ :
agnikiran@upi, agnikiran@axisbank

संघटनेने पुढे म्हटले आहे की, आम्हाला दान केल्यावर त्याचा ‘स्क्रीनशॉट’ आणि संबंधित माहिती [email protected] या पत्त्यावर पाठवावी. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात दान पाठवायचे असेल अथवा शैक्षणिक प्रकल्पास अर्थसाहाय्य करायचे असेल, तर वरील इमेल पत्त्यावरच तुमचा संपर्क क्रमांक पाठवावा. आम्ही तुम्हाला संपर्क करू !

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *