Menu Close

कुरीग्राम (बांगलादेश) येथे राधापद रॉय या ८० वर्षीय साधूवर जीवघेणे आक्रमण !

  • इस्लामी बांगलादेशात सातत्याने होत आहेत हिंदु धर्म आणि हिंदु साधू-संत यांच्यावर आक्रमणे !

  • झिनायदा जिल्ह्यातील श्री दुर्गादेवी मंदिरातील मूर्तीची धर्मांध मुसलमानांनी केली तोडफोड !

पाकिस्तान असो अथवा बांगलादेश, तेथील हिंदूंना आता कुणीच वाली उरलेला नाही. भारत सरकारही या जिहादी देशांकडे अशा घटनांवरून साधा निषेधही नोंदवत नाही. आता भारतभरातील हिंदूंनीच त्यांच्या शेजारी देशांतील बांधवांच्या सुरक्षिततेची हमी मिळण्यासाठी भारत सरकारवर दबाव आणून त्या माध्यमातून पाक आणि बांगलादेश यांना हिंदूंचे रक्षण करण्यास बाध्य केले पाहिजे ! -संपादक 

मारहाण करण्यात आलेले हिंदु साधू राधापद रॉय

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात धर्मांध मुसलमान हिंदूंवर सातत्याने आक्रमणे करत आहेत. आता कुरीग्राम जिल्ह्यातील नागेश्‍वरी येथील राधापद रॉय नावाच्या हिंदु साधूला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. ही माहिती केवळ तेथील अल्पसंख्यांक समाजावरील अन्याय जगासमोर आणणार्‍या ‘पाकिस्तान अनटोल्ड’ अथवा ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ यांसारख्या ट्विटर खात्यांवरूनच नव्हे, तर बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनीही ट्वीट करून दिली आहे. नसरीन यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, रफिकुल इस्लाम आणि कादुर अली यांनी ८० वर्षीय साधू राधापद रॉय यांना मारहाण केली. ट्वीटसमवेत त्यांनी घायाळ अवस्थेतील रॉय यांची छायाचित्रेही जोडली आहेत.

पोराहाती गावात श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड

बांगलादेशातील अन्य एका घटनेमध्ये झिनायदा जिल्ह्यातील पोराहाती गावात श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली आहे. ‘हिंदु व्हॉईस’ने त्याच्या ट्विटर खात्यावरून याविषयीची माहिती देतांना सांगितले की, इस्लामी बांगलादेशात श्री दुर्गादेवीच्या मूर्तींची तोडफोड सातत्याने होत आहे. फरीदपूर, गोपालगंज आणि नाराइल या जिल्ह्यांतील घटनांनंतर आता झिनायदा या जिल्ह्यात दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. ‘हे स्पष्ट आहे की, बांगलादेश त्याच्या हिंदु अल्पसंख्यांकांचे संरक्षण करण्यास अपयशी ठरले आहे’, असेही या ट्वीटमध्ये पुढे सांगण्यात आले आहे.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *