Menu Close

लंडन येथील भारतीय दूतावासाबाहेर खलिस्तान्यांकडून राष्ट्रध्वजाची विटंबना !

राष्ट्रध्वजावर गोमूत्र ओतून ब्रिटनच्या पंतप्रधानांना म्हटले, ‘तुम्ही येऊन प्या!’

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक खलिस्तान्यांविषयी मवाळ भूमिका घेत आहेत. आता हेच खलिस्तानी त्यांचाही अवमान करू लागले आहेत. आतातरी ऋषी सुनक खलिस्तान्यांवर कठोर कारवाई करून त्यांच्या भारतविरोधी कारवाया मोडून काढतील, अशी अपेक्षा ! -संपादक 

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

लंडन (ब्रिटन) – येथे खलिस्तान्यांनी ३ ऑक्टोबर या दिवशी भारतीय दूतावासाबाहेर आंदोलन केले होते. तेव्हा त्यांनी भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याची घटना समोर आली आहे. खलिस्तानी आतंकवादी गुरचरण सिंह याने या आंदोलनाच्या वेळी भारताचा राष्ट्रध्वज भूमीवर ठेवून त्यावर गोमूत्र ओतले आणि त्यावर बाटली ठेवल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या वेळी सिंह याने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना म्हटले, ‘तुम्ही येऊन ते पिऊ शकता.’ या वेळी एका भारतियाने लगेच राष्ट्रध्वज उचलून घेतल्याचेही यात दिसत आहे.

काही मासांपूर्वीही दूतावासाबाहेर खलिस्तान्यांनी आंदोलन करून हिंसाचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न भारताच्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून करण्यात आला आहे. त्यातही गुरचरण सिंह याचा समावेश आहे. तो ब्रिटनमधील ‘दल खालसा’ संघटनाचा सदस्य आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने या प्रकरणी सामाजिक माध्यमांवर ज्या खलिस्तान्यांची छायाचित्रे प्रसारित केली आहे, त्यात गुरचरण १७ व्या क्रमांकावर आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *