Menu Close

सनातन धर्मावर अभद्र टीका करणार्‍यांवर खटले चालवा ! – जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे ‘हिंदु योद्धा परिवार’ संघटनेची मागणी

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना ‘हिंदु योद्धा परिवार’चे कार्यकर्ते

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – सनातन धर्माला नष्‍ट करण्‍याची भाषा करणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅॅलीन, कर्नाटकचे ग्रामीण विकास मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे द्रमुक खासदार ए. राजा यांनी सनातन धर्मावर आक्षेपार्ह वक्‍तव्‍य केले. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर भारतीय दंड विधान १९७३ चे कलम १९६ कलमांतर्गत खटला चालवण्‍यात यावा, तसेच भारतीय दंड विधान १८६० चे कलम १५३ (अ), १५३ (ब), २९५ (अ), २९८, ५०५ आणि माहिती-तंत्रज्ञान कायदा यांच्‍या अंतर्गत खटले प्रविष्‍ट करण्‍यात यावेत, या मागणीसाठी ‘हिंदु योद्धा परिवार’ने केंद्रीय गृहमंत्र्यांसाठी स्‍थानिक जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले. याप्रसंगी सर्वश्री मुकुल जुनेजा, शुभम कम्‍बोज, आयुष मोगा, आदित्‍य कश्‍यप, सागर राणा, अनिकेत कुमार, ऋषभ कुमार, सोनी, सौरभ कौशक, गौरव ठकरल, नीरज ठकरल, सुमित कुमार आदी कार्यकर्ते उपस्‍थित होते.

या वेळी ‘हिंदु योद्धा परिवार’चे सहारनपूरचे जिल्‍हा कार्यकारिणी अध्‍यक्ष श्री. राम अवतार म्‍हणाले, ‘‘ज्‍या ज्‍या जिल्‍ह्यांमध्‍ये हिंदु योद्धा परिवारचे कार्यकर्ते आहेत, तेथे हे निवेदन देण्‍यात येत आहे.’’

संघटनेचे शहराध्‍यक्ष श्री. गौतम कालियान म्‍हणाले, ‘‘सनातन धर्माशी छेडछाड करणार्‍यांवर कारवाई झाली नाही, तर ‘हिंदु योद्धा परिवार’ आंदोलन करील.’’

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *