Menu Close

धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक आधारावर असणारी हलाल अर्थव्‍यवस्‍था रहित करा ! – इचलकरंजी येथे निवेदन

नायब तहसीलदार संजय काटकर (डावीकडून सहावे) यांना निवेदन देतांना हिंदुत्‍वनिष्‍ठ

इचलकरंजी (जिल्‍हा कोल्‍हापूर) – धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक आधारावर असणारी हलाल अर्थव्‍यवस्‍था रहित करा, तसेच ‘सनातन धर्मा’ला नष्‍ट करण्‍याची आक्षेपार्ह आणि द्वेषमूलक भाषा करणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅलिन, द्रमुकचे खासदार ए. राजा अन् त्‍याचे समर्थन करणारे कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे यांना तात्‍काळ अटक करण्‍यात यावी, या मागण्‍यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने इचलकरंजी येथे उपविभागीय कार्यालयात नायब तहसीलदार संजय काटकर यांना देण्‍यात आले.

या प्रसंगी आंतरराष्‍ट्रीय हिंदु परिषदेचे जिल्‍हामंत्री श्री. पंढरीनाथ ठाणेकर आणि जिल्‍हा विशेष संपर्कप्रमुख श्री. संतोष हत्तीकर, ‘एकम् सनातन भारत दला’चे श्री. विनोदकुमार ओझा, राष्‍ट्रीय बजरंग दल सेवा विभागाचे श्री. सुनील शंकर कांदेकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. आनंदा मकोटे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संजय घाटगे, सुरेश रणदिवे, शिवानंद स्‍वामी उपस्‍थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *