पुणे : राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने येथील मंडईतील टिळक पुतळा आणि पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी त्या मागण्यांसाठी स्वाक्षरी चळवळही राबवण्यात आली होती. या संदर्भातील निवेदन २६ मे या दिवशी नायब तहसीलदार नंदा परदेशी यांना देण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री कृष्णा पाटील आणि विनायक बागवडे आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
हिंदु धर्मपरंपरांना आव्हान देणार्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यावर कठोर कारवाई करावी, देहली विद्यापिठाच्या पाठ्यपुस्तकांतून क्रांतीकारकांचा अवमान करणार्यांवर गुन्हा प्रविष्ट करावा, तसेच कर्नाटकातील हिंदु मंदिर तोडून तेथे मशीद बांधणार्यांवर कारवाई करावी, या विषयांसाठी १५ मे या दिवशी आंदोलन केले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात