Menu Close

अमेरिकेत पाद्रयाने एका मुलीवर १५ वर्षे सातत्याने केला बलात्कार !

मुलीला गर्भवती करून मूल जन्माला घालण्यास भाग पाडले !

अशा घटना भारतातील प्रसारमाध्यमे दडपतात; कारण त्या स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात आणि त्यांच्या लेखी पाद्री म्हणजे सभ्य गृहस्थ असतात ! -संपादक 

‘सेंक्चुअरी चर्च ऑफ क्राइस्ट’ या चर्चमधील पाद्री रॉबर्ट कार्टर

ह्यूस्टन (अमेरिका) – येथील ‘सेंक्चुअरी चर्च ऑफ क्राइस्ट’ या चर्चमधील रॉबर्ट कार्टर नावाच्या पाद्रयाने जवळपास १५ वर्षे एका मुलीवर ६०० वेळा बलात्कार केला. यात ती गर्भवती झाली. तिला मुलाला जन्म देण्यासही बाध्य केले होते. तिच्यावर प्रथम बलात्कार केला, तेव्हा ती ७ वर्षांची होती. पीडित मुलीच्या वडिलांनी पाद्री रॉबर्ट याला ‘राक्षस’ म्हटले आहे. कार्टर याने या मुलीवर तिच्या घरी आणि अन्य ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला होता. यात ग्रेटर बायबल चर्च या ठिकाणाचाही समावेश आहे. (चर्चमध्ये बलात्कार करणार्‍यांविषयी भारतातील निधर्मीवादी तोंड उघडणार नाहीत ! – संपादक) पाद्रयाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 (सौजन्य : KPRC 2 Click2Houston)

ख्रिस्ती धर्माचा प्रसार करतांना असे कृत्य करत होता ! – पीडित मुलीचे वडील

पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, पाद्री कार्टर आमच्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे होता. मला कळत नाही की, तो ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत फिरत आहे आणि अशा प्रकारचे कृत्य करत आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *