Menu Close

अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आदी देशांमध्ये मुसलमानांकडून हमासने केलेल्या आक्रमणाचे रस्त्यावर उतरून समर्थन

हमासकडून इस्रायल आणि अन्य देशांच्या नागरिकांवर करण्यात आलेल्या अश्‍लाघ्य अत्याचारांचा मात्र कोणत्याही इस्लामी देशाने किंवा संघटनेने विरोध केलेला नाही, हे लक्षात घ्या ! -संपादक

लंडन (ब्रिटन) – हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणाला पाश्‍चात्त्य देश विरोध करत असतांना इस्लामी देशांकडून समर्थन केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर जगातील काही ठिकाणी मुसलमानांकडून हमासच्या आक्रमणाचा आनंद साजरा करण्यात येत आहे, तसेच त्यांना समर्थन दिले जात आहे. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, स्विडन, जर्मनी आणि तुर्कीये येथेही मुसलमानांनी पॅलेस्टाईनचे झेंडे घेऊन घोषणाबाजी करत आनंद साजरा केला.  या संदर्भातील व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. न्यूयॉर्क येथे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांचे समर्थक एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे दिसून आले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *