Menu Close

ईदच्‍या दिवशी राष्‍ट्रध्‍वजातील ‘अशोक चक्रा’च्‍या ऐवजी ‘चांद-तारा’ असलेला ध्‍वज फडकला !

कर्नाटकच्‍या उत्तर कन्‍नड जिल्‍ह्यातील घटना !

क्रूरकर्मा टिपू सुलतान याचा उदोउदो करणार्‍या सत्ताधारी काँग्रेसच्‍या राज्‍यात याहून वेगळे काय घडणार ? -संपादक

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

कुमठा (कर्नाटक) – ‘ईद-मिलाद’च्‍या दिवशी तालुक्‍यातील मिर्जानी येथे स्‍थानिक ‘जमातुल मुस्‍लिमीन समिती’ने काढलेल्‍या मिरवणुकीच्‍या वेळी राष्‍ट्रध्‍वजातील अशोक चक्राच्‍या स्‍थानी ‘चांद-तार्‍या’चे चित्र रेखाटलेला ध्‍वज फडकवल्‍याचे उघडकीस आले. राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान केल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी स्‍वतः तक्रार प्रविष्‍ट करून चौकशीला प्रारंभ केला आहे.

कुमठा पोलीस कर्मचारी प्रदीप यशवंत नायक यांना ‘केसरी सम्राट’ नावाच्‍या इन्‍स्‍टाग्राम खात्‍यावरून २८ सप्‍टेंबर या दिवशी प्रसारित झालेला एक व्‍हिडिओ निदर्शनास आला. तो व्‍हिडिओ उत्तर कन्‍नड जिल्‍ह्यातील कुमठा येथील मिरजानीचा असल्‍याचे त्‍यांना लक्षात आले. त्‍या व्‍हिडिओसमवेत ‘यापुढे राष्‍ट्रध्‍वजातून केसरी आणि पांढरा रंग जाऊन संपूर्ण हिरव्‍या रंगात तो रंगविला जाईल. जागो भारतीय जागो !’, असा संदेश लिहिण्‍यात आला होता. या प्रकरणी पोलीस पुढील अन्‍वेषण करत आहेत.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *