दंगलीमागे भारतातील सीमेवरील मदरशांचा हात असल्याचा संशय !
उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेवर गेल्या काही वर्षांत बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात मुसलमानांची वस्ती होण्यासह तेथे मशिदी आणि मदरसे उभे रहात आहेत. ‘हे पोलिसांना ठाऊक असूनही त्यांच्यावर अद्याप कारवाई का होत नाही ?’, हे आश्चर्यच आहे ! -संपादक
नवी देहली – नेपाळमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये हिंदु आणि मुसलमान यांच्यात दंगली घडल्या आहेत. नेपाळच्या बांके जिल्ह्यातील नेपाळगंज भागामध्ये काही जण गोमांस खात असल्याचा व्हिडिओ २५ सप्टेंबरला प्रसारित झाल्यावर ३ ऑक्टोबर या दिवशी दंगल उसळली. यानंतर नेपाळकडून नेपाळ-भारत सीमा बंद करण्यात आली. या घटनेनंतर नेपाळच्या सीमेवरील उत्तरप्रदेशातील महाराजगंज, सिद्धार्थनगर, बलरामपूर, श्रावस्ती, बहराइच, लखीमपुर खीरी आणि पीलीभीत येथील पोलिसांना सतर्क रहाण्याचा आदेश देण्यात आला. नेपाळमध्ये वर्ष २०२३ आतापर्यंत गोहत्येवरून ५ दंगली घडल्या आहेत. यातून नेपाळमध्ये जाणीवपूर्वक हिंसाचार करण्याचा षड्यंत्र रचण्यात आल्याचे समोर येत आहे. नेपाळ सीमेवरील भारतातील भागांतील अवैधरित्या उभारण्यात आलेल्या मदरशांतून हे षड्यंत्र रचण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात