भारताने सांगितले आणि पाकने ऐकले, असे कधी झाले नाही आणि पुढेही कधी होणार नाही, हे भारतीय राज्यकर्ते समजतील तो सुदिन !
वॉशिंग्टन : भारत-पाक संबंध खर्या अर्थाने अधिक चांगल्या स्तरापर्यंत जाऊ शकतात; मात्र त्यासाठी प्रथम पाकने स्वतःहून निर्माण केलेल्या आतंकवादाची बाधा दूर करावी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी द वॉल स्ट्रीट जनरलच्या संकेतस्थळावर पोस्ट करतांना केले आहे.
मोदी यांनी पुढे लिहिले आहे की, आम्ही पहिले पाऊल उचलायला सिद्ध आहोत; मात्र शांतीचा मार्ग दोन्ही बाजूने असायला हवा. पाकने त्यांची भूमिका बजावली पाहिजे. आम्ही यापूर्वीच म्हटले आहे की, आपण एकमेकांच्या विरोधात लढण्याऐवजी गरिबीच्या विरोधात लढायला हवे.
मोदी यांनी पुढे असेही स्पष्ट केले आहे की, आतंकवादावर कोणतीही तडजोड करता येणार नाही. आतंकवाद तेव्हाच थांबू शकतो, जेव्हा त्याला देण्यात येणारे समर्थन थांबले जाईल. मग तो आतंकवाद सरकारद्वारा प्रायोजित असणारा असेल अथवा सरकारेतर असेल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात