शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची त्वरित अंमलबजावणी करणे आवश्यक !
नांदेड : अतिशय निर्दयीपणे टेम्पोतून कोंबून तेलंगणा राज्यात ५ गायी आणि ६ गोर्हे यांना घेऊन जाणार्या शे. मुखीद शे. इमाम साब (वय २३ वर्षे) आणि शे. युनुस शे. महेबूब (वय ३२ वर्षे) यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या धर्मांधांना काही गोप्रेमींनी पोलिसांच्या कह्यात दिले.
१. तेलंगणा राज्यात गोवंशियांची वाहतूक होत असल्याचे लक्षात आल्यावर गोशाळेचे संचालक किरण बिच्चेवार यांनी वाहनाचा पाठलाग केला; पण अंधार असल्याने वाहने नंतर दिसली नाहीत.
२. काही युवकांना याविषयी कळताच त्यांनी दोन्ही टेम्पोंना थांबवले; परंतु धर्मांध वाहनचालकाने उर्मटपणाचे उत्तर देऊन गाडी न थांबवता वेगाने पुढे नेली. त्या युवकांनी आणखी काही गोप्रेमींना याविषयी कळवले.
३. गोप्रेमींच्या जमावामुळे एका चौकात धर्मांधांनी गाडी थांबवली; पण लगेचच पुन्हा एका कार्यकर्त्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. युवकांनी वाहनांना कह्यात घेऊन पोलीस येईपर्यंत धर्मांधांना तेथेच थांबून ठेवले. नंतर पोलिसांच्या कह्यात दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात