Menu Close

इस्रायलने आतंकवाद्यांनी शरण घेतलेल्या गाझा पट्टीतील ७ मशिदींना केले नष्ट !

शस्त्रास्त्रांची निर्मिती करणारे इस्लामी विश्‍वविद्यालयही जमीनदोस्त !

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून ‘आतंकवाद कसा संपवायचा’, याचा आदर्श घालून दिला. आज इस्रायल त्यानुसारच जिहादी आतंकवाद्यांचा खात्मा करत आहे ! – संपादक 

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलने आतंकवाद्यांचा अड्डा असलेल्या गाझातील ७ मशिदींवर आक्रमण करून त्यांना नष्ट केले आहे. या आक्रमणांत अनेक आतंकवादी मारले गेल्याचे सांगितले जात आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की, या मशिदींमध्ये आतंकवादी शरण घेतात. अल्-अब्बास, अल्-सूसी, अल्-यारमौक, अल्-अमीन महंमद, अहमद यासीन, अल्-हबीब महंमद आणि अल्-गरबी या ७ मशिदींवर बाँबचा मारा करून त्यांना पाडण्यात आले, अशी माहिती इस्रायली वायूसेनेने दिली आहे. वायूसेनेने यासंदर्भातील व्हिडिओही प्रसारित केला आहे. यासह वायूसेनेने गाझा शहरातील इस्लामी विश्‍वविद्यालयावर आक्रमण करून त्याला नष्ट केले आहे. या विश्‍वविद्यालयात हमास त्याच्या अभियंत्यांना आतंकवादी प्रशिक्षण देण्यासह शस्त्रास्त्रांची निर्मिती करत होता. यामुळेच इस्रायली युद्ध विमानांनी या विश्‍वाविद्यालयावर बाँबफेक करून त्याला नष्ट केले.

सौजन्य : Haber Lütfen

१. इस्रायली संरक्षणयंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत गाझातील २ सहस्र ३०० हून अधिक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. हमासने केलेल्या आक्रमणांत आतापर्यंत १ सहस्र २०० हून अधिक लोक मारले गेले असून ३ सहस्रांहून अधिक लोक घायाळ झाले आहेत.

२. प्रतिआक्रमणात इस्रायलने आतापर्यंत १ सहस्र पॅलेस्टिनी आतंकवाद्यांना ठार मारले असून ५ सहस्रांहून अधिक लोक घायाळ झाले आहेत. इस्रायलने गाझा पट्टीची नाकाबंदी केली असून तेथे वीज, पाणी आणि गॅस यांचा पुरवठा बंद केला आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *