पाकिस्तानमध्ये भूमाता ब्रिगेडसारख्या स्त्रीवादी संघटना नसल्याचा हा परिणाम समजायचा का ? आता भूमाता ब्रिगेडने पाकिस्तानातही शाखा उघडावी !
इस्लामिक परिषदेच्या महिलांचे संरक्षण विधेयकात अनेक तरतुदी
इस्लामाबाद : पाकिस्तानातील कौन्सिल ऑफ इस्लामिक आयडीओलॉजी संस्थेने महिलांचे संरक्षण विधेयक सिद्ध केले आहे. त्यानुसार जर पत्नीने पतीची आज्ञा पाळली नाही, तर तिला सौम्य मारहाण करण्याची पतीला मुभा असल्याचे प्रावधान केले आहे.
त्यात पत्नीने पतीने सांगितलेले कपडे न घालणे, लैंगिक संबंधास नकार, त्यानंतर आणि मासिक पाळीनंतर स्नान करण्यास नकार इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. तसेच महिलांनी हिजाब घालणे अनिवार्य आहे, महिलांनी सैन्यात सहभाग घेऊ नये, विदेशी पाहुण्यांचे स्वागत करू नये, परपुरुषांशी बोलू नये, असे अनेक नियम त्या विधेयकात आहेत.
रुग्णालयात परिचारिकांनी पुरुषांची सेवा करू नये, विज्ञापनांमध्ये काम करू नये. गर्भारपणात १२० दिवस उलटल्यावर गर्भपात करू नये, असेही नियम करण्यात आले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात