Menu Close

‘अल्लाहू अकबर’ म्हणत फ्रान्समधील एका शालेय शिक्षकाची चाकू खुपसून हत्या !

(‘अल्लाहू अकबर’ म्हणजे अल्ला महान आहे !)

अर्‍रास येथे एका शालेय शिक्षकाची चाकू खुपसून हत्या

पॅरिस (फ्रान्स) : येथील उत्तर भागात असलेल्या अर्‍रास येथे एका शालेय शिक्षकाची चाकू खुपसून हत्या करण्यात आली. या आक्रमणात अन्य दोघेही गंभीररित्या घायाळ झाले आहेत. १३ ऑक्टोबरच्या सकाळी ११ वाजता ही घटना घडली असून फ्रान्सचे अंतर्गत मंत्री गेराल्ड डारमानिन यांनी या घटनेची पुष्टी केली आहे, अशी माहिती ‘द लोकल फ्रान्स’ या वृत्तसंकेतस्थळाने दिली आहे. अर्‍रास शहरात असलेल्या गॅम्बेट्टा विद्यालयात ही घटना घडली असून आक्रमणकर्त्याने ‘अल्लाहू अकबर’ म्हणत हे आक्रमण केले. आक्रमणकर्ता हा या शाळेचा माजी विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे.

१. स्थानिक अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार आक्रमणकर्ता आणि त्याचा एक भाऊ यांना पोलिसांनी अटक केली आहे. हत्या झालेले शिक्षक हे विद्यार्थ्यांना फ्रेंच भाषा शिकवत असत, तर घायाळांपैकी एक क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे.

२. नेदरलँड्सचे इस्लामविरोधी खासदार आणि ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष गीर्ट विल्डर्स यांनी या घटनेची ‘एक्स’वरून व्हिडिओ प्रसारित करून माहिती दिली आहे.

(सौजन्य : FRANCE 24 English)

३. ३ वर्षांपूर्वी म्हणजे १६ ऑक्टोबर २०२० या दिवशी पॅरिसमध्ये साम्युएल पॅटी नावाच्या एका शिक्षकाचा त्याच्या एका मुसलमान विद्यार्थ्याने ‘अल्लाहू अकबर’ म्हणत शिरच्छेद केला होता. यावरून जगभरात याचे तीव्र पडसाद उमटले होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *