ध्वनीप्रदूषणामुळे केला जात होता विरोध !
ध्वनीप्रदूषण करणार्यांवर कारवाई झालीच पाहिजे; मात्र त्याच्या नावाखाली होणारा हिंसाचार योग्य नाही. हिंसाचार करणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे ! -संपादक
मुझफ्फरपूर (बिहार) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील १४ ऑक्टोबरच्या क्रिकेट सामन्यात भारताने विजय मिळवल्यावर येथील पुरानी गुदरी भागात रात्री फटाके फोडण्यात आले. त्यावरून झालेल्या वादातून एका गटाने दुसर्या गटावर तलवार आणि दगड यांद्वारे आक्रमण केले. यात शुभम् नावाच्या तरुणाचे बोट कापले गेले.
एका गटाने फटाके फोडणार्यांना ‘या भागात आजारी व्यक्ती आणि मुले अधिक आहेत. त्यामुळे फटाके फोडू नका’, असे सांगितले. यावरून वाद होऊन वरील घटना घडली. घटनास्थळी पोलीस पोचल्यावर आक्रमण करणारे पळून गेले. पोलिसांनी येथे पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तसेच शांती समितीची बैठक आयोजित केली आहे.
भारत-पाकिस्तान के मैच के उपरान्त मिठनपुरा थाना अंतर्गत गुदरी में हर्ष में पटाखा फोड़ने के क्रम में दो पक्षों के बीच विवाद हुआ।
थाना की टीम द्वारा तत्काल मौके पर पहुंच कर दोनों पक्षों के विवाद को शांत कराया गया।— Muzaffarpur Police (@MuzaffarpurPol3) October 14, 2023
स्रोत: दैनिक सनातन प्रभात