Menu Close

उत्तरप्रदेशात नवरात्री कलश यात्रेवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण

मशिदीजवळ पोचताच विटा-दगडांचा मारा

  • भारतात हिंदूंचे सण आणि त्यांच्या शोभायात्रा यांना धर्मांधांकडून वारंवार लक्ष्य केले जाते. त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?
  • भारतात बहुतांश मशिदी आणि त्याच्या बाजूचा परिसरात हिंदुविरोधी कारवाया चालतात, याचे आणखी एक उदाहरण ! -संपादक 

कुशीनगर (उत्तरप्रदेश) – येथे हिंदूंच्या नवरात्री कलश यात्रेच्या वेळी धर्मांध मुसलमानांच्या जमावाने आक्रमण केले. मशिदीजवळ जमलेल्या धर्मांधांनी कलश यात्रेवर विटा-दगडांचा मारा केला. हिंसाचाराच्या वेळी आक्रमणकर्त्यांनी ५ वर्षांच्या मुलालाही लक्ष्य केले. या प्रकरणी आतापर्यंत ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

१. कुशीनगर जिल्ह्यातील लक्ष्मीपूर गावातील रहिवासी नरेश शहा यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. तक्रारीत म्हटले आहे, ‘गावात दुर्गापूजेची कलश यात्रा काढण्यात आली होती. यात्रा मशिदीजवळ पोचताच मुसलमान जमावाने ती थांबवली. तबरेज आणि त्याच्या मुसलमान साथीदारांनी यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांवर आक्रमण केले. या कलश यात्रेत महिलांचाही सहभाग होता. त्यांना शिवीगाळही करण्यात आली. आक्रमणकर्त्यांनी भाविकांवर विटा आणि दगड यांचा मारा केल्याचा आरोप आहे.

२. गावात शांतता असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *