-
मंगळुरू (कर्नाटक) येथील श्री मंगलादेवी मंदिर परिसरात हिंदु व्यापार्यांनाच दुकाने लावण्याची अनुमती देण्याचे प्रकरण
-
जिल्हा प्रशासनाने काही मुसलमान व्यापार्यांनाही दिली लिलावात सहभागी होण्याची अनुमती
मुसलमानांच्या उरूसात अथवा अन्य उत्सवांत कधीतरी हिंदूंना दुकान लावण्याची अनुमती दिली जाते का ? अशा प्रकारे हिंदुद्रोही निर्णय घेणार्या मंगळुरू जिल्हा प्रशासनाचा धिक्कार ! -संपादक
मंगळुरू (कर्नाटक) – येथील श्री मंगलादेवी मंदिराच्या परिसरात सर्व हिंदु व्यापार्यांच्या दुकानांवर विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भगवे ध्वज लावले आहेत. या माध्यमातून भाविकांना ‘कोणते दुकान हिंदूचे आहे ?’, हे लक्षात येईल. विहिंपचे दक्षिण कन्नड जिल्हाध्यक्ष एच्. के. पुरुषोत्तम यांचे म्हणणे आहे की, जिल्ह्यातील सर्व मंदिरांनी मंदिर परिसरात हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी केवळ हिंदु व्यापार्यांनाच व्यापार करण्याची अनुमती दिली पाहिजे.
१. पुरुषोत्तम पुढे म्हणाले की, जिल्हा प्रशासनाद्वारे अहिंदु लोकांना दुकानांसाठी जागा देणे योग्य नाही. ‘हिंदु धार्मिक संस्थान आणि धर्मार्थ बंदोबस्त अधिनियम १९९७’ या कायद्यानुसार तेथे दुसर्या समुदायांतील लोकांना व्यवसाय करण्यासाठी अनुमती देण्याचे कोणतेच प्रावधान नाही.
२. दुसरीकडे १३ ऑक्टोबर या दिवशी दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्हा उत्सव व्यापारी समन्वय समितीने मुसलमान व्यापार्यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने काही मुसलमान व्यापार्यांना मंदिर परिसरात दुकाने थाटण्यासाठी असलेल्या लिलावामध्ये सहभागी होण्याची अनुमती दिली.
‘डी.वाय.एफ्.आय.’ या मुसलमानांच्या राजकीय पक्षाला पोटशूळ !
जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा राजकीय पक्ष असलेल्या ‘डी.वाय.एफ्.आय.’नेे विहिंपला विरोध करत म्हटले आहे की, विहिंप गरीब हिंदु आणि मुसलमान व्यापार्यांमध्ये शत्रुत्व निर्माण करत आहे. जिल्हा प्रशासनाने श्री मंगलादेवी मंदिराच्या परिसरातील व्यापार्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करायला हवेत.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात