पाकध्ये हिंदु तरुणीचे अपहरण, धर्मांतर आणि मुसलमान तरुणाशी बलपूर्वक विवाह करवून दिल्याचे प्रकरण
पाकमधील न्यायालयेही हिंदुद्वेषी आणि जिहादी मानसिकतेची आहेत, असे कुणी म्हटले, तर आश्चर्य वाटू नये ! – संपादक
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मीरपूरखास येथे रिटा मेघवार या हिंदु तरुणीचे २ मासांपूर्वी तिच्या घरातूनच अपहरण झाले होते. मुसलमान तरुण अहमदनी याने हे अपहरण केले होते. नंतर तिचे धर्मांतर करून या तरुणासमवेत तिचे लग्न लावून देण्यात आले. या संदर्भात न्यायालयात खटला चालवण्यात आल्यावर न्यायालयाने तिला आश्रयगृहात पाठवले. रिटा हिने न्यायालयाला ‘विवाहामुळे आनंदी नसून पुन्हा आई-वडिलांकडे जायचे आहे’, असे सांगितले; मात्र न्यायालयाने ते स्वीकारले नाही. ती पुनःपुन्हा न्यायालयाला असे सांगण्याचा प्रयत्न करत होती; मात्र न्यायालयाने तिचे काहीही ऐकले नाही. या तरुणीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
सौजन्य: आरसीएमस्वाभिमानभारत
स्रोत: दैनिक सनातन प्रभात