श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीचा सहावा दिवस
सांगली (महाराष्ट्र) – ‘जो देश आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही, तो विश्वाच्या संघर्षात वाचत नाही. याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे भारत होय’, असे थोर देशभक्त इतिहासकार वि.का. राजवाडे यांनी लिहून ठेवले आहे. राजवाडे यांचे रहाणीमान अत्यंत साधे होते. त्यांनी अखंड वाचन, चिंतन, मनन करून अमूल्य असे ग्रंथ संपादित केले आहेत. वि.का. राजवाडे यांनी त्यांच्या कार्यकालात २२० ग्रंथ लिहून ठेवले असून ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या संदर्भातील २३ खंड लिहिले. त्यामुळेच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील अनेक महत्त्वाचे संदर्भ कळतात, असे प्रतिपादन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते श्री दुर्गामाता दौडीच्या सहाव्या दिवशी माधवनगर येथे बोलत होते.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात