हिंदुद्वेषी संघटनांचे शेतकर्यांमध्ये विद्वेष पसरवण्याचे हे कारस्थानच होय !
पुणे : सध्याच्या शासनाने राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा केला असून तो तुघलकी आणि पेशवाई यांना लाजवेल, असे टीकात्मक प्रतिपादन शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपिट यांनी केले.
शेतकरी संघटना आणि अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २७ मे या दिवशी आयोजित केलेल्या संयुक्त धरणे आंदोलनाच्या वेळी ते म्हणाले.
या वेळी मराठा सेवा संघ, छावा संघटना, छावा युवा संघटना, अखिल भारतीय मराठा महासंघ, कुरेशी जमाअत, महाराष्ट्र, मुस्लीम विकास परिषद आदींसह अन्य संघटना सहभागी झाल्या होत्या.
शेतकरी विरोधी कायदे केल्यास भारतमाता की जय म्हणण्याची अपेक्षा करू नका !
आपिट पुढे म्हणाले की, मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. केंद्रशासनाने शेतकर्यांच्या मालाला निर्यात करण्यास बंदी आणली असून देशामध्येही त्या मालाला चांगली किंमत मिळत नाही. असे असतांना आम्हाला पाकिस्तानात मालाची विक्री करण्यासाठी पाठवल्यास आम्ही तिकडे जाण्यास सिद्ध आहोत. भारतामध्ये शेतकरी विरोधी कायदे केल्यास आमच्याकडून भारतमाता की जय म्हणण्याची अपेक्षा करू नका ! (असे जर आहे, तर आपिट यांनी खुशाल पाकिस्तानात जावे, म्हणजे मग पाकिस्तान कसा आहे, ते कळेल. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
म्हणे शेतकर्यांनी स्वतः न मरता राज्यकर्त्यांना बुडवून मारायचे ! – शंकर गायकवाड, युवा अध्यक्ष, शेतकरी संघटना
आताच्या शासनाने आश्वासने न पाळल्यास मंत्र्यांच्या गाड्या अडवू. आता येथून पुढे शेतकर्यांनी स्वतः न मरता राज्यकर्त्यांना बुडवून मारायचे आहे.
(म्हणे) भाकड जनावरांसाठी गोवंश हत्याबंदी कायदा रहित करा ! – रूपेश बेंद्रे, छावा मराठा संघ
शेतकर्यांची भाकड जनावरे त्यांना अन्न न मिळाल्यास मरत आहेत. असे असतांना त्यासाठी गोवंश हत्याबंदी कायदा रहित करायला हवा. शासनाने शेतकरी विरोधी भूमिका बंद न केल्यास महाराष्ट्रात मंत्र्यांच्या गाड्या फिरू देणार नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात