अमरावती (महाराष्ट्र) – पतंजली योगपीठ, हरिद्वार यांच्याकडून अमरावती येथे नुकतेच प्रांतीय महिला महासंमेलन घेण्यात आले. त्यामध्ये पू. आचार्या डॉ. साध्वी देवप्रियाजी यांनी महिलांनी आयुष्यात विविध भूमिका पार पाडत असतांना आदर्श कसे रहावे ? याविषयी इतिहासातील उदाहरणे देऊन उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले, तसेच योग आणि ध्यान करण्याच्या महत्त्वाविषयी सांगितले. या कार्यक्रमात अमरावती येथील विविध क्षेत्रांत समाजासाठी सक्रीयपणे कार्य करणार्या काही महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. अनुभूती टवलारे यांचाही सत्कार पतंजली योगपीठ, हरिद्वार संस्थेच्या वतीने करण्यात आला. या वेळी अपक्ष खासदार सौ. नवनीत राणा उपस्थित होत्या.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात