Menu Close

सनातन धर्म संपवण्याची भाषा करणार्‍यांच्या विरोधात अमरावती येथे तक्रार प्रविष्ट !

पोलीस अधिकार्‍यांना तक्रार देतांना हिंदुत्वनिष्ठ

अमरावती (महाराष्ट्र) – सनातन धर्म संपवण्याची भाषा करून द्वेषपूर्ण विधानांमधून तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलीन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, ए. राजा, पत्रकार निखिल वागळे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळेच या सर्वांच्या विरोधात अमरावती येथे राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली.

या वेळी श्रीराम सेनेचे सर्वश्री विजय दुबे, प्रमेंद्र शर्मा, कवल पांडे, शिवसेनेच्या सौ. वृंदा मुक्तेवार, ‘समर्पिता ग्रुप’च्या श्रीमती अल्का सप्रे, हिंदु जागरण मंचच्या सौ. रश्मी गांधी, ‘ओजस्विनी’ संघटनेच्या सौ. मानसी साहू, तसेच हिंदु जनजागृती समितीचे नीलेश टवलारे, सौ. अनुभूती टवलारे, रमेश वरूडकर, शशांक चौधरी, सतीश शेंद्रे, रोहन ढोमने, सौ. दिव्या ढोमने, कु. हर्षा ढोमने, संजय चौधरी, महेश ढोमने, विनोद सरकटे हे उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *