२ सहस्र ४५० मशिदींना मिळणार्या देणग्यांचीही चौकशी होणार !
भारताने देशातील पाकप्रेमींना हाकलण्याचा निर्णय घेतला, तर ती संख्या कोटींमध्ये असेल, यात शंका नाही ! – संपादक
पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्समध्ये धार्मिक स्थळांना मिळणार्या देणग्यांची चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी फ्रान्सने देशातील २ सहस्र ४५० मशिदींची सूची बनवली आहे. काही धार्मिक स्थळांच्या ठिकाणी शिक्षणाच्या नावाखाली कट्टरतावादी विचारसरणीला प्रोत्साहन दिले जात आहे, असे आढळून आले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यासह फ्रान्सने जिहादी आतंकवाद मोडून काढण्यासाठी शरणार्थी म्हणून देशात आश्रय घेणार्या २० सहस्रांहून अधिक मुसलमान कट्टरतावाद्यांना देशातून हाकलण्यासाठी सूची बनवली आहे. काही दिवसांपूर्वी एका मुसलमान तरुणाने एका शिक्षकाची चाकूने भोसकून हत्या केली होती.
१. फ्रान्सच्या गृह मंत्रालयाला वाटते की, रशियासमवेत युरोपमधील देशांमध्ये शरण मागण्याच्या नावाखाली फ्रान्समध्ये रहाणारे लोक देशातील लोकशाही व्यवस्थेचे अपलाभ घेऊन धर्मांधतेला प्रोत्साहन देत आहेत. (भारतातही याहून वेगळे काही घडत आहे, असे नाही ! – संपादक)
२. फ्रान्सने वर्ष २०१७ ते २०२१ या काळात ७ लाख लोकांना शरण दिली होती. यात ६ लाख लोक पाकिस्तान, सीरिया, लिबिया, मोरक्को आणि क्रोएशिया येथून आले होते.
फ्रान्सने यापूर्वीच शाळांमध्ये ‘अबाया’वर घातली आहे बंदी !
(‘अबाया’ म्हणजे चेहरा सोडून सर्व शरीर झाकणारे वस्त्र)
फ्रान्सने २ मासांपूर्वीच सर्व सरकारी शाळांमध्ये विद्यार्थिनींना ‘अबाया’ घालण्यावर बंदी घातली आहे. त्यापूर्वी वर्ष २००४ मध्ये हिजाब (मुसलमान महिलेने डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) आणि वर्ष २०१४ मध्ये बुरखा घालण्यावर बंदी घातली आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात