गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र) – येथील ‘श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित’ यांच्या वतीने ‘अनंतव्रती’ पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून ज्येष्ठ अभिनेते आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे प्रसारक श्री. शरद पोंक्षे यांना निमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी श्री. शरद पोंक्षे यांची भेट घेऊन त्यांना डॉ. अमित थढानी लिखित ‘दाभोलकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये ?’ हे पुस्तक भेट दिले. या प्रसंगी समितीचे सर्वश्री आदित्य शास्त्री आणि संजय मुरुकटे उपस्थित होते.