हमासचे अप्रत्यक्ष समर्थन !
- गेल्या काही दिवसांतील पुणे येथे आतंकवादी सापडण्याच्या घटना पहाता इस्रायलचा विरोध आणि हमासचे अप्रत्यक्ष समर्थन करणारे पुणे शहरात असणे धोकादायक !
- आज हमाससाठी प्रदर्शन करणारे उद्या ‘गजवा-ए-हिंद’साठी (भारताला इस्लामिस्तान बनवण्यासाठी) रस्त्यावर उतरतील. यासाठी अशांवर वेळीच कठोर कारवाई करून त्यांची पाळेमुळे नष्ट करणे आवश्यक ! -संपादक
पुणे (महाराष्ट्र) – इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये चालू असलेल्या युद्धाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटत आहेत. या युद्धाच्या निमित्ताने पुणे शहरातील काही भागांत रस्त्यांवर इस्रायल देशाच्या राष्ट्रध्वजाचे ‘स्टिकर्स’ लावण्यात आले आहेत. या ध्वजांवर पायाचे ठसेही उमटले आहेत. इस्रायलच्या राष्ट्रध्वजाची विटंबना करून हमासचे अप्रत्यक्ष समर्थन करण्यात आले आहे. ‘पुणे शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असे लोकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पुणे शहरातील लष्कर, समर्थ, कोंढवा आणि खडक या ४ पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. हे कृत्य करण्यामागे एकूण ६ जण असल्याचे समजते. पोलिसांनी रस्त्यांवर लावलेले ‘स्टिकर्स’ काढले आहेत.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात