Menu Close

येत्या दिवाळीला श्रीकृष्ण उत्सव साजरा करा – गोव्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे आवाहन

वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर (वर्तुळात)

मडगाव (गोवा) – येत्या दिवाळीला नरकासुरांचा उदो उदो करू नका, त्यापेक्षा श्रीकृष्ण उत्सव साजरा करा. आपल्या संस्कृतीचे जतन करा, असे आवाहन वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांनी केले. मडगाव येथे राजेंद्र प्रसाद मैदानातील ‘एम्.सी.सी.’ सभागृहात वीज प्रकल्पाच्या पायाभरणी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर बोलत होते. या वेळी व्यासपिठावर आमदार दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर आदींची उपस्थिती होती.

नरकासुरदहन प्रथा संपूर्ण गोव्यातच बंद होणे आवश्यक आहे, असे वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर पुढे म्हणाले. या वेळी इतरांचीही भाषणे झाली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *